संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद महाराष्ट्र राज्याच्या.जळगाव जिल्हा अध्यक्षपदी शिवश्री ह.भ.प. अनिल मराठे महाराज यांची नियुक्ती

संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद महाराष्ट्र राज्याच्या.जळगाव जिल्हा अध्यक्षपदी शिवश्री ह.भ.प. अनिल मराठे महाराज यांची नियुक्ती करण्यात आली

जानवे. ता. अंमळनेर येथे दिनांक 5 ऑक्टोबर २०२२ बुधवार रोजी संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेची बैठक घेण्यात आली याप्रसंगी संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवश्री ह. भ. प. गंगाधर महाराज कुरुंदकर हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते सदर बैठकीत जिल्हा कमिटी गठीत करणे बाबत साधक वादक चर्चा होऊन संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र शिवश्री ह.भ.प. अनिल महाराज मराठे पाचोरा यांना देण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवश्री हिरालाल केशवराव पाटील शिवश्री विनायक राऊतराय सर शिवश्री श्रीराम बापू पाटील हे उपस्थित होते निर्भंगापली ग्रंथाचे लेखक संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्राध्यापक शिवाजीराव पाटील सर गांधीलीकर यांनी कीर्तन परंपरा व संत साहित्येच्या विषयावर सखोल परी मार्गदर्शन केले या बैठकीचे सूत्रसंचालन शिव श्री रवींद्र भाऊ पाटील पाचोरा यांनी केले प्रस्ताविक शिवश्री विश्वासराव पाटील अमळनेर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री विठ्ठल एकनाथ महाजन माऊली पाचोरा यांनी केले.