भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ केतकी ताई पाटील निर्मित वंदे मातरम @१५० दिनदर्शिकेचे ना.गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते प्रकाशन 

भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ केतकी ताई पाटील निर्मित वंदे मातरम @१५० दिनदर्शिकेचे ना.गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते प्रकाशन

 

 

 

वंदे मातरम @१५० दिनदर्शिकेचे ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते जळगावमध्ये दिमाखदार प्रकाशन

 

जळगाव: भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या ‘वंदे मातरम’ या राष्ट्रमंत्राला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने, भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकीताई पाटील यांनी निर्मित केलेल्या ‘वंदे मातरम @१५०’ विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशन आज करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते जळगाव येथील जी.एम. फाउंडेशनमध्ये शनिवार, २७ डिसेंबर २०२५ रोजी हा सोहळा उत्साहात पार पडला.

 

याप्रसंगी व्यासपीठावर नामदार गिरीश भाऊ महाजन, आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश दादा चव्हाण, डॉ राजेंद्रजी फडके, माजी महापौर नितीनजी लढा, जळगाव महानगरचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जळगाव जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी, भाजपा जळगाव जिल्हा पूर्व च्या सरचिटणीस डॉ केतकी पाटील, पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ना.गिरीश भाऊ महाजन म्हणाले की, वंदे मातरम हे गीत आजही प्रत्येकामध्ये देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करते. देशाच्या प्रगतीसाठी आणि संरक्षणासाठी एकजूट राहण्याची प्रेरणा या गीतातून मिळत असून या गीताबद्दल आणि त्यावेळी घडलेल्या परिस्थीबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न या दिनदर्शिकेतून करण्यात आला असून प्रत्येक घरासाठी ही दिनदर्शिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगत ना.गिरीश महाजन यांनी कौतुक केले.या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

…….

 

वंदे मातरम ची ऊर्जा घराघरात पोहचविण्यासाठी निर्मिती

 

वंदे मातरम हे केवळ शब्द नसून भारतीयांची ऊर्जा आहे. स्वातंत्र्यलढ्यात वंदे मातरम मुळे स्फुरण आले. या राष्ट्रीय मंत्राला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने ही ऊर्जा घराघरात पोहोचवण्या साठी दिनदर्शिकेची निमिती करण्यात आली आहे.

डॉ केतकी पाटील, जिल्हा सरचिटणीस, भाजप जळगाव जिल्हा पूर्व.