पाचोरा शहरातील कला शाखेतून मिठाबाई कन्या शाळेच्या मुली अव्वल

पाचोरा शहरातील कला शाखेतून मिठाबाई कन्या शाळेच्या मुली अव्वल

 

पाचोरा-
येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या शाळेचा इयत्ता बारावीचा निकाल 95:40 टक्के लागला असून पाचोरा शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील कला शाखेतून मिठाबाई कन्या शाळेच्या मुलींनी अव्वल क्रमांक पटकावला आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक मिठाबाई कन्या विद्यालय ही पाचोरा शहरातील एकमात्र कन्या शाळा आहे. या शाळेतून इयत्ता बारावीच्या परीक्षेत एकूण 87 मुली प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी 3 तीन विद्यार्थीनी परीक्षेला सतत गैरहजर राहिल्या. उर्वरित 84 मुलींपैकी फक्त एक मुलगी अनुत्तीर्ण झाली. उत्तीर्ण झालेल्या 83 विद्यार्थिनींमधून प्रथम क्रमांक पटकावलेली अर्चना आरती राजेंद्र पाटील हिने 75:83 टक्के गुण मिळवत पाचोरा ब (तावरे शाळा) केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मिठाबाई कन्या शाळेच्या मुली या गुणवत्तेत सुद्धा अव्वल आहेत. पाचोरा शहर व तालुक्यातील कला शाखेच्या मुलींमध्ये मिठाबाई विद्यालयाच्या मुलींनी गुणात्मक दृष्ट्या उंच झेप घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

विश्वासराव ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशील राजे पवार, सेक्रेटरी श्रीमती रूपालीराजे जाधव, विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.

मिठाबाई कन्या शाळेत पहिल्या 5 क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे व त्यांना मिळालेले गुण खालील प्रमाणे

आरती राजेंद्र पाटील -75.83
धनश्री सुनील निळे -75.00
सुविधा सुरेश पवार -74.00
प्रतीक्षा रवींद्र गायकवाड -73.50
कविता अशोक पाटील- 73.16

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्रा.रवींद्र चव्हाण सर, प्रा. प्रतिभा परदेशी मॅडम, प्रा. शिवाजी शिंदे सर, श्रीमती उज्वला देशमुख, प्रा. अंकिता राहुलराव देशमुख, प्रा. संगीता राजपूत मॅडम, व प्रा. प्रतिभा पाटील मॅडम यांचेसह सर्व जेष्ठ शिक्षकांचे मार्गदर्शक लाभले.