Home पाचोरा पाचोरा नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन पथकाची अतिवृष्टीने बाधीत झालेल्या भागात भेट

पाचोरा नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन पथकाची अतिवृष्टीने बाधीत झालेल्या भागात भेट

पाचोरा नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन पथकाची अतिवृष्टीने बाधीत झालेल्या भागात भेट

पाचोरा: पाचोरा शहरातील दिनांक 08/07/2022 रोजी संध्याकाळी सलग 3 तास झालेल्या प्रचंड अतिवृष्टीने शहरातील भिम नगर, जनता वसाहत, नागसेन नगर, हनुमान नगर,वाल्मिकी कॉलनी या भागात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होऊन नागरीकांच्या घरात, दुकानात मोठया प्रमाणात पाणी शिरल्याने आज दिनांक 09/07/2022 रोजी मा.आमदार श्री.किशोर आप्पा पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, उद्योजक मुकूंद अण्णा बिल्दीकर, कंत्राटदार मनोज शांताराम पाटील, प्रविण ब्राम्हणे, उपमुख्याधिकारी दगडू मराठे, बांधकाम अभियंता ईश्वर सोनवणे, मधुकर सुर्यवंशी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकातील कर्मचारी आरोग्य् विभागाचे मुकादम,कर्मचारी यांनी सकाळी भेट देऊन या प्रभावीत भागाची पाहणी करण्यात आली व नगरपालिकेकडून या भागातील पाणी पाहून जाण्यासाठी नाले, गटारी त्वरीत बांधण्याबाबत मा.आमदार श्री.किशोर आप्पा पाटील यांनी सुचीत केले असता त्वरीत या भागातील नाले व गटारी बांधण्याबाबत बांधकाम अभियंता यांना मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती शोभा बाविस्कर यांनी आदेशीत केले. या भागातील गटारी व नाल्यांचा प्रलंबित विषय मार्गी लागणार असल्याचे आश्वासन दिल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी न.पा.अधिकारी कर्मचारी, स्चव्छता विभागाचे कर्मचारी व परिसरातील नागरीक उपस्थित होते.

Don`t copy text!