पाचोरा तालुक्यातील खेडगाव,हडसन,दुसखेडा व बिल्दी गावात गावठी विषारी दारूचा सुळसुळाट; ग्रामपंचायत प्रशासन अवैध दारू विक्री करणाऱ्या पुढे हतबल

पाचोरा तालुक्यातील खेडगाव,हडसन,दुसखेडा व बिल्दी गावात गावठी विषारी दारूचा सुळसुळाट; ग्रामपंचायत प्रशासन अवैध दारू विक्री करणाऱ्या पुढे हतबल!

पाचोरा तालुक्यातील श्री क्षेत्र नंदिकेश्वर महाराज मंदिर असलेल्या गावी तसेच आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये बिलदी,हडसन दूसखेडा, वडगाव,वेरूळी या गावांमध्ये स्थानिक नागरिकांकडून अवैधरित्या विषारी गावठी दारूचे मद्यविक्री करण्यात येत असून सदर गावठी दारू विक्रेते कोणालाही न जुमानता गावठी दारूची सर्रास विक्री करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. या गावठी दारू विक्री विरुद्ध गावातील नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवल्यावर सदर अवैध दारु विक्रेत्यांकडून कुठलीही दारू विक्री बंद झाली नसून यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी सदर अवैध गावठी दारू विक्रेत्यांवर मागील काही काळात राज्य उत्पादन शुल्क व पाचोरा पोलिसांच्या वतीने कारवाई देखील करण्यात आली होती, त्या कारवाईला ही न जुमानता अवैध दारू विक्री सर्रास पणे सुरू आहे. मागील काही काळामध्ये या विषारी दारुमुळे अनेकांना देखील गमवावा लागला असून त्यांचा संसार व परिवार उघड्यावर आला आहे. यावर स्थानिक प्रशासनाने यांच्यावर कठोर कारवाई करून अवैध गावठी दारू विक्री कायम स्वरूपी बंद करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.