मृत्युंजय साहित्य गौरव पुरस्कार रंधा ह्या भाऊसाहेब मिस्तरी यांच्या बहुचर्चित कादंबरीला जाहीर

मृत्युंजय साहित्य गौरव पुरस्कार रंधा ह्या भाऊसाहेब मिस्तरी यांच्या बहुचर्चित कादंबरीला जाहीर


मा. पुरुषोत्तम सदाफुले अध्यक्ष म.का. साहित्य परिषद पुणे यांनी नुकतेच भाऊसाहेब मिस्तरी यांना रंधा कादंबरीसाठी मृत्युंजय साहित्य गौरव पुरस्कारसाठी आपली निवड झाल्याचे पत्र दिले आहे. रंधा ही कादंबरी
ग्रामीण वास्तव , तेथील बलूतेदारी , वतनदारी यांच्या औदार्याचा सुक्ष्म व संवेदन परिपाठ मांडते.
रंधा ही भाऊसाहेब मिस्तरी लिखित कादंबरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मॉडेल कॉलेज घनसांगवी जि. जालना बी.ए ऑनर्स मराठी द्वितीय वर्ष सत्र चौथे सीबीसीएस पद्धतीनुसार जून २०२३ पासून लागू करण्यात आली आहे.
भाऊसाहेब मिस्तरी यांची रंधा ही कादंबरी बहुचर्चित आहे. या कादंबरीवर अनेक मान्यवरांनी अनेक वृत्तपत्रातून नियतकालिकातून लेखन केलेले आहे. यासोबतच खानदेशी रेडिओवर रंधा कादंबरीवर मान्यवरांनी लिहिलेल्या समीक्षांचे सलग १९ भागात प्रसारण करण्यात आले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने रंधा निर्मिती प्रक्रियेवर भाऊसाहेब
मिस्तरी यांचे यापूर्वी व्याख्यान आयोजित केले होते.
प्रा. डॉ. सर्जेराव जिगे अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांचे रंधा कादंबरी निवडी विषयकपत्रक भाऊसाहेब मिस्तरी यांना प्राप्त झाले आहे. साहित्य आणि सांस्कृतिक विभागातील अनेक मान्यवरांनी डॉ.भाऊसाहेब मिस्तरी यांचे अभिनंदन केले आहे आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.