अखेर महविकास आघाडीच्या आंदोलनाला यश जळगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला मिळाली गती

अखेर महविकास आघाडीच्या आंदोलनाला यश
जळगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला मिळाली गती

पाचोरा(प्रतिनीधी)—जळगाव ते पाचोरा,भडगाव चाळिसगाव या तालुक्यामधुन जाणार्‍या राष्टिय महामार्गात ठिकठिकाणी राहिलेले काम पुर्ण होत नसल्यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी येणार्‍या समस्यांना सामोरे जावे लागत होते.हा रस्ता तातडिने दुरूस्ती करण्यासाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी आमदार दिलिप वाघ यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनाला यश प्राप्त झाले असुन संबंधित विभागाने सदर कामाना निधी प्राप्त झाला असुन महाविकास आघाडीच्या या आदोलनाच्या यशाचे सर्वञ अभिनंदन व स्वागत होत आहे.

जळगाव ते चांदवड या राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या ०४ वर्षापासून ठीक ठिकाणी काम रखडलेले होते. सदर रखडलेल्या कामामुळे जनतेला प्रचंड यातना सहन करावा
लागत होत्या. सदर रस्त्याचे रखडलेले काम आहे त्या स्थितीत डांबरीकरण करून पूर्ण करण्यात यावे व जनतेला होणारा त्रास थांबवा. यासाठी २१ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, संजय वाघ, शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी, राष्ट्रीय काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, नितीन तावडे,विकास पाटील, अजहर खान, हर्षल पाटील, राहुल पाटिल, शाम भोसले, गणेश परदेशी, योजना पाटील, जे. के. पाटील, ललित वाघ, विनोद तावडे, योगेश सूर्यवंशी, विनोद बाविस्कर, शरद पाटील, व्ही. एस. पाटील, कुणाल पाटील, रमेश बाफना, सुनील पाटील, विनोद पाटिल, सुदर्शन महाजन, रेखा ताई देवरे, सरला पाटील, ज्योती वाघ, रेखा पाटील, रवींद्र महाजन, योगेश महाजन, रणजित
पाटील, जनार्दन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा ते कजगाव दरम्यान पाच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. सदर रास्ता रोको आंदोलनाच्या
दिवशी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी विक्रम बांदल यांच्या उपस्थितीत सदर कामासाठी तातडीने ०९ कोटी रुपयांच्या कामाचे अंदाजपत्रक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले असून या अंदाजपत्रकास ताबडतोबीने मंजुरी घेऊन हे काम त्वरित सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. या आश्वासनाप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाच्या संचालकांनी
महाराष्ट्र राज्याच्या बांधकाम विभागास सदर काम मंजूर करण्यात येत असून त्यासाठी ०९ कोटी २० लाख रुपये या रकमेस मान्यता देण्यात आल्याचे कळविले आहे. सदर रस्त्याच्या कामास यामुळे ताबडतोब गती मिळणार असून जनतेचा प्रवास हा सुखकर होणार आहे. महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनास मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त झाले असून यामुळे नागरिकांनी सर्व वाहनधारकांनी व इतर
संघटनांनी अभिनंदन केले आहे.