श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर,पाचोरा येथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर,पाचोरा येथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (वाचन प्रेरणा दिन)यांची जयंती साजरी करण्यात आली. आजच्या कार्यक्रमास मुख्य इमारतीत सकाळ सत्रात अध्यक्ष म्हणून श्री.अभिजीत महालपुरे सर,दुपार सत्रात श्री.गणेश सोनवणे सर व भरो विभागात श्री.दीपक पाटील सर होते. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली .भरो विभागात श्री. दीपक पाटील सर यांनी आपल्या बंधूंच्या स्मरणार्थ तर मुख्य इमारतीत श्री.आशिष पाटील सर यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ शाळेस “फोटो-स्टॅन्ड” भेट दिले. तसेच शाळेतील श्री.नारायण सोनवणे सर,श्रीमती.उज्वला साळुंखे मॅडम,श्रीमती.सारिका पाटील मॅडम,श्रीमती. जयश्री पाटील मॅडम,श्री.रवींद्र महाले सर,श्री. मनोज पवार सर,श्री.संदीप वाघ सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक परदेशी सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनपट उलगडून सांगितला. तसेच विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले.मा. अध्यक्ष यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मनोज पवार सर,श्रीमती सुरेखा पाटील मॅडम, श्रीमती.रुपाली निकम मॅडम तर आभार श्री.रवींद्र महाले सर,श्री. स्वप्निल माने सर,श्री.भूषण पाटील सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.