15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिनाचे औचित्य साधून ग्राहक सेवा संघ पाचोरा भडगाव यांच्यातर्फे जागतिक ग्राहक दिन साजरा केला

15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिनाचे औचित्य साधून ग्राहक सेवा संघ पाचोरा भडगाव यांच्यातर्फे जागतिक ग्राहक दिन साजरा केला

( पाचोरा प्रतिनिधी  )  भारतात 2019 मध्ये केंद्र सरकारने नवीन ग्राहक संरक्षण कायदा पास केला त्याची अंमलबजावणी 20 जुलै 2020 पासून करण्यात आली ग्राहक संरक्षण कायद्याची ग्राहकांना माहिती व्हावी तसेच अधिकार आणि कर्तव्य ग्राहक चळवळ याची माहिती व्हावी याचे प्रबोधन व्हावे म्हणून ग्राहक सेवा संघ पाचोरा भडगाव यांच्यातर्फे नवीन ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकांसाठी कसा वरदान ठरणार आहे.. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ॲड सौ मनीषा पवार यांनी भूषविले ग्राहक सेवा संघाचे मार्गदर्शक श्री डी एफ पाटील सर तसेच नवनिर्वाचित सरचिटणीस श्री आनंद नवगिरे, कार्याध्यक्ष सौ लता शर्मा उपाध्यक्ष श्री विनोद राय मोदीखलील दादा देशमुख सुनील शिंदे प्रवीण ब्राह्मणे,योगेश पाटील सर ,राजू भोई, भरत प्रजापत, माया सूर्यवंशी , ॲड मीना सोनवणे, सौ विद्या कोतकर सहअन्य मान्यवरांची देखील उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्वला महाजन मॅडम यांनी केले.. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री व्ही.टी जोशी सर ,श्री गोपाल पटवारी ,सौ राधा शर्मा आणि सौ ललिता कृष्णराज पाटील हे होते… सर्व वक्त्यांनी प्रभावी वक्तृत्व केले. सौ.ललिता पाटील यांनी 2019 च्या भेसळ विरोधी कायदे विषयी माहिती दिली… तसेच त्यांनी सध्या होत असलेल्या वैचारिक भेसळीवरही काहीतरी कायदा काढला पाहिजे अशी मिश्किल टिप्पणी देखील केली.. कार्यक्रमा च्या शेवटी श्री एजे महाजन सर यांनी आभार प्रदर्शन केले