आदर्श शिक्षक रवींद्र सूर्यवंशी यांचा सत्कार

आदर्श शिक्षक रवींद्र सूर्यवंशी यांचा सत्कार

 

 

पाचोरा नगरदेवळा येथील कन्या माध्यमिक विद्यालयात  सत्कार समारंभ संपन्न झाला
तालुक्यातील नगरदेवळा ए. टी. गुजराथी कन्या शाळेचे उपशिक्षक रवींद्र हिलाल सूर्यवंशी यांना नुकताच “भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार 2022” प्राप्त झाला. या निमित्ताने माणिकराजे पवार संस्थेचे विश्वस्त प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी गिरणाई शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, मिठाबाई कन्या विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार, नगरदेवळा कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती चंद्रकला शेलार, केंद्रप्रमुख श्री मोराणकर, ए. जे. महाजन, विद्यालयाचे शिक्षक अनिल काटकर, राजेंद्र राजपूत, श्री मिलिंद सोनवणे, राहुल पाटील, अनिल पवार, डी. एस. पवार, वरिष्ठ लिपिक आबा महाजन, आदी मान्यवर उपस्थित होते.
जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था, रोटरी क्लब जळगाव आणि युवा विकास फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रवींद्र सूर्यवंशी यांना 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त “भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
याप्रसंगी उपस्थित शिक्षकांनी श्री. रवींद्र सूर्यवंशी यांच्या कार्याचा गौरव करणारे मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक आर.डी. वाघ यांनी सूत्रसंचालन व आभार प्रकटन केले. या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

रविंद्र सूर्यवंशी यांचा परिचय
◼️शिक्षण- B.sc B.Ed, M.A. M.Ed
◼️एकूण सेवा – 24वर्ष
◼️अध्यापनाचा विषय – गणित व विज्ञान

उल्लेखनीय कार्य
◼️ विद्यार्थ्यांना गणिताची गोडी निर्माण करणे भीती दूर करणे
◼️गणितीय शाळा भरून विद्यार्थ्यांचे गणिताच्या संकल्पना दृढीकरण केले.
◼️कृतीयुक्त उदाहरणांचा भरपूर सराव करून घेणे, विविध प्रात्यक्षिक पेपर घेऊन सराव करून घेणे.
◼️गेल्या वीस वर्षापासून इयत्ता दहावीचा गणित विषय शंभर टक्के निकाल
◼️दरवर्षी विज्ञान प्रदर्शना त विद्यार्थी व स्वतः सहभागी होऊन विज्ञानाची गोडी निर्माण करणे
◼️कोरोनाच्या काळात खेड्यांवर जाऊन अध्यापनाचे काम केल्यामुळे विविध वृत्तपत्रांनी दखल घेतली
◼️व्हीं स्कूल ॲप मध्ये उल्लेखनीय कामाबद्दल 17 जून रोजी जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडून सत्कार
◼️नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक शिक्षक गटामधून केलेल्या मॉडेल जिल्हास्तरावर निवड.