कै.पि.के.शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भाजपा युवा मोर्चा आयोजित मोफत समर व्हॅकेशनला- डॉ.प्रा.अतुल सूर्यवंशी सर यांचे मार्गदर्शन

कै.पि.के.शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भाजपा युवा मोर्चा आयोजित मोफत समर व्हॅकेशनला- डॉ.प्रा.अतुल सूर्यवंशी सर यांचे अमुल्य मार्गदर्शन

पाचोरा-

कै.परशराम कोंडीबा शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भारतीय जनता युवा मोर्चा पाचोरा आयोजित मोफत समर व्हॅकेशन क्लासेसला आज दि.५ जुन २०२२ रविवार रोजी डॉ. प्रा. अतुल सूर्यवंशी सर यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.यावेळी त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दहावी व दहावी नंतर चे करिअर या विषयावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस.व्हि.गीते सर तसेच देसले सर, क्षीरसागर सर, जोशी सर, चेतन पाटील सर, महाजन सर, जाधव सर व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.