पाचोऱ्यात भारतरत्न स्व. लतादीदींना कॉंग्रेस ने दिली आदरांजली

पाचोऱ्यात भारतरत्न स्व. लतादीदींना कॉंग्रेस ने दिली आदरांजली

पाचोरा (प्रतिनिधी) – भारतरत्न गानसम्राज्ञी स्व लतादीदींना पाचोरा कॉंग्रेस ने पणती लावुन आदरांजली वाहिली

शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात लतादीदींच्या जीवनातील कारकिर्दीला सुरुवात पाचोरा शहरा पासून झाली लतादीदींच्या प्रत्येक मुलाखतीत पाचोर्याचा आवर्जून उल्लेख केला गेला हा शहरवासीयांना अभिमानाचा विषय होता. काॅंग्रेस कमिटी च्या वतीने पणती आणि लतादीदींच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला प्रत्येकाने पणती लावुन* आदरांजली वाहिली यात काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष अॅड. अमजद पठाण

राजु महाजन, अॅड वसिम बागवान, महीला शहर अध्यक्षा शिलाताई सुर्यवंशी, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे,शिवदास पाटील, ओबीसी शहर अध्यक्ष समाधान ढाकरे, अमजद मौलाना, शारीख बागवान, रवी पाथरवट, मुकेश पाटील यांचेसह स्थानिक काॅंग्रेस पदाधिकारी आदींनी सहभाग घेतला याप्रसंगी स्व. लता दिदींच्या सुमधुर आवाजाच्या गीतांनी परिसर मंत्रमुग्ध झाला होता. शहरातील नागरिकांनी देखिल सहभाग घेतला