पिंपळगाव पोलिसांची यशस्वी कामगिरी वयोवृद्ध महिलेचे दागिने चोरून फरार होणाऱ्या आरोपीस शितापीने अटक

पिंपळगाव पोलिसांची यशस्वी कामगिरी वयोवृद्ध महिलेचे दागिने चोरून फरार होणाऱ्या आरोपीस शितापीने अटक

पाचोरा प्रतिनिधि
पिंपळगाव पोलीस स्टेशनला गेल्या एक वर्षापासून रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महेंद्र वाघमारे साहेब यांनी चार्ज घेतल्यापासून अनेक मोठे मोठे गुन्हे उघडी किस आणले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात योग्य ती जबाबदारी पार पाडत असून नुकतीच पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत वृद्ध महिलेच्या घरात घुसून एका आरोपीने तिचे दागिने लंपास केले होते कुठलाही पुरावा किंवा साक्षीदार नव्हता अशा वेळी त्या वृद्ध महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता श्री महेंद्र वाघमारे साहेब यांनी तात्काळ आपले वरिष्ठ श्री पोलीस अधीक्षक साहेब माननीय श्री एम राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे साहेब व पोलीस उपअधीक्षक श्री भारत काकडे साहेब यांना माहिती देऊन कळविले होते वरिष्ठांच्या आदेशानुसार श्री महेंद्र वाघमारे साहेब यांनी तात्काळ आपली एक टीम तयार करून संपूर्ण घटनेची माहिती घेऊन त्या परिसरातील सी सी कॅमेरे तसेच त्या परिसरातून त्यावेळेस कोण कोण गेले होते याची संपूर्ण गोपनीय माहिती घेऊन एक पोलीस पथक तयार केले व त्या पथकामध्ये श्री जितेंद्र पाटील व गोकुळ सोनवणे या दोन पोलीस शिपायांना फरार असलेल्या आरोपीचे लोकेशन घेऊन त्यांना अकोले येथून शिताफीने अटक केली यावेळी पोलीस शिपाई श्री जितेंद्र पाटील व श्री गोकुळ सोनवणे यांनी वेशांतर करून आरोपी असलेल्या ठिकाणी पहारा केला व त्याला मुद्देमालासह अटक करून पिंपळगाव पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या कामी पीएसआय श्री अमोल पवार श्री गोकुळ सोनवणे श्री जितेंद्र पाटील श्री अमोल पाटील श्री पंकज सोनवणे श्री शिवनारायण देशमुख श्री अभिजीत निकम श्री रणजीत पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक श्री महेंद्र वाघमारे व पीएसआय अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य कामगिरी करून आरोपीस जेरबंद केले त्यामुळे पोलीस स्टेशनचे पोलिसांचे कौतुक होत आहे