चोपडा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ विषयावर परिसंवादाचे आयोजन

चोपडा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ विषयावर परिसंवादाचे आयोजन

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात इयत्ता बारावी व तृतीय वर्ष (कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील) विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता स्मार्ट हॉल येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिसंवादात धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील तज्ञ मार्गदर्शक डॉ. एच.आर. तळले हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील इयत्ता बारावी व तृतीय वर्षामध्ये प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डॉ.ए. एल. चौधरी, उपप्राचार्य एन. एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, तसेच परिसंवादाचे समन्वयक डी. एस. पाटील व डॉ.एल.बी.पटले यांनी केले आहे.