श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यालय, पाचोरा येथे रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यालय, पाचोरा येथे रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न….

[ सत्यशोधक समाजातर्फे विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम ]
श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यालय,पाचोरा येथे सत्यशोधक समाज संघ, जिल्हा अधिवेशन कुऱ्हा (पानाचे) ता.भुसावळ आयोजनाच्या औचित्याने 🎨रंगभरण व ✒️हस्ताक्षर स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या .श्री.विजय लुल्हे जिल्हा आयोजन समिती सदस्य यांच्या कल्पनेतून महात्मा ज्योतिराव फुले यांचे सत्यशोधकीय अलौकिक कार्य विद्यार्थी व कुटूंबियांपर्यंत पोहोचून प्रचार व प्रसार व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये मानवी मुल्यांची जोपासना होऊन ते सत्यशील व निर्भय व्हावे . देशप्रेम व समाजाभिमुख होऊन विद्यार्थी परिपूर्ण व्हावे या व्यापक उद्दिष्टांसाठी स्पर्धा जिल्ह्यात घेण्यात आल्या .
स्पर्धा निहाय आणि इयत्तेनुसार गुणवंत विद्यार्था पुढील प्रमाणे – *सुंदर हस्ताक्षर स्पर्धा ( इयत्ता – ३ री )* : – * प्रथम क्रमांक – रेवाई जितेंद्र मिस्तरी * द्वितीय क्रमांक – रितीका काळुकुमार * तृतीय क्रमांक – स्नेहल रविद्र पाटील *रंगभरण स्पर्धा इयत्ता – ४ थी )* : -* प्रथम क्रमांक – कृतीका तानाजी पाटील * द्वितीय क्रमांक – लखन प्रविण राठोड * तृतीय क्रमांक – प्रियदर्शी दिपक सोनवणे.✒️हस्ताक्षर स्पर्धेचे मूल्यमापन श्री.दीपक पाटील सर व 🎨 रंगभरण स्पर्धेचे मूल्यमापन श्री.राहुल वाघ यांनी केले . स्पर्धेचा निकाल मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर यांनी घोषित केला.स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सत्यशोधक समाज संघातर्फे प्रमाणपत्र देण्यात येतील असे स्पर्धा संयोजिका तथा साहित्यिका श्रीमती. सारिका पाटील यांनी सांगितले.स्पर्धेच्या यशस्वितेसाठी उपशिक्षक श्रीमती.जयश्री पाटील,चारुशीला पाटील , रूपाली निकम,श्री.संदीप वाघ ,भुषण पाटील यांनी अमुल्य सहकार्य केले.