गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव येथे प्राचार्यपदी आर. आर. वळखंडे यांची नियुक्ती…!!!
कोळगाव ता. भडगाव :–कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित गो.पु. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव ता. भडगाव जि. जळगाव येथे नवीन प्राचार्य म्हणून आर. आर. वळखंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी दिनांक १ मे २०२६ रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
प्राचार्य वळखंडे यांनी यापूर्वी माध्यमिक विद्यामंदिर, महिंदळे ता. भडगाव तसेच सौ. साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, आमडदे ता. भडगाव येथे प्राचार्य म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, विद्यार्थी विकास तसेच शिस्तप्रिय प्रशासन यासाठी त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
कार्यभार स्वीकारल्यानंतर बोलताना प्राचार्य वळखंडे यांनी विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्या सहकार्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण, डिजिटल शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमूल्य जपण्यावर विशेष भर देणार असल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. नानासाहेब प्रतापराव हरी पाटील, व्हा. चेअरमन डॉ. पुनमताई प्रशांत पाटील, सचिव दादासाहेब प्रशांत विनायकराव पाटील, स्थानिक स्कूल कमिटीचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नवीन प्राचार्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
























