श्री.गो.से. हायस्कूल येथे इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दिनांक 3 जून रोजी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी
शालेय समितीचे चेअरमन मा. दादासाहेब श्री. खलील देशमुख हे होते.
किमान कौशल्य विभागातील इयत्ता बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच इयत्ता दहावी मध्ये प्रथम दहा क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पेढे व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.आर. ठाकरे सर, उपमुख्याध्यापक श्री.आर.एल.पाटील सर, पर्यवेक्षिका सौ.ए.आर. गोहिल मॅम, श्री.आर बी बांठिया सर, श्री.एम.टी.कौंडिण्य सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. आर.बी.बोरसे सर, इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक, इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थी व पालकांनी शाळेचे सर्व पदाधिकारी व शिक्षकांनी त्यांना केलेल्या अमोल मार्गदर्शनाबद्दल सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दादासाहेब श्री. खलील देशमुख व मुख्याध्यापक श्री.एन.आर.ठाकरे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सर्व गुणवंत विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर.बी.बोरसे सर व आभार श्री. उज्वल पाटील सर यांनी केले.





















