पिटीसीने इन कॅमेरा परीक्षेतही मारली बाजी
सु.गी.पाटील विद्यालयाचा जयेश भोई ९८.२० टक्के गुणांसह पाचोरा भडगाव तालुक्यातून प्रथम
पाचोरा-पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने इन कॅमेरा झालेल्या आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला आव्हान देणाऱ्या एसएससी परीक्षेत देखील बाजी मारली असून संस्थेच्या भडगाव येथील सौ.सु.गी.पाटील माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी जयेश संभाजी भोई हा ९८.२०गुणांसह पाचोरा भडगाव तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा मानांक मानकरी ठरला आहे.
याशिवाय संस्थेच्या विविध विद्यालयातील एसएससी परीक्षेचा निकाल उत्कृष्ट जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याचे दिसून आले आहे. संस्थेच्या विविध शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करत यशोशिखराकडे वाटचाल केली आहे.
*श्री.गो.से.हायस्कूल,पाचोरा*
या विद्यालयाचा ८७.२० एवढा निकाल जाहीर झाला असून विद्यालयातील प्रविष्ट झालेले ४६१ विद्यार्थ्यांपैकी ४०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यसह घवघवीत यश प्राप्त केलेले आहे. प्रथम तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे-
प्रथम- ललित बळवंत आंबेकर – ९४.६ द्वितीय- हर्षल शैलेंद्र चौधरी ९४.६ तृतीय- मोहित गणेश पाटील- ९२
चतुर्थ – स्वरूप अशोक राठोड-९१
पाचवा -खुशी मनोहर सोनवणे-९०
*सौ.सु.गी.पाटील विद्यालय, भडगाव*
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ.सु.गी.पाटील माध्यमिक विद्यालय भडगावने एसएससी परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केले असून विद्यालयाचा निकाल ८३.८३% एवढा लागला असून एकूण १६७ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थी संख्या १४० असून एकूण ३५ विद्यार्थी विशेष प्राविण्यसह गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले. प्रथम पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे-*
*प्रथम- जयेश संभाजी भोई ९८.२० द्वितीय-गौरव संदीप महाजन ९५ *तृतीय-आदित्य उमाकांत शिंपी ९१
*चतुर्थ -नंदिनी नारायण पाटील ८९
*पाचवा -तेजस संदीप पाटील ८६.६०
डाॅ.राम मनोहर लोहीया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बांबरुड (राणीचे)
बांबरुड (राणीचे) येथील डाॅ.राम मनोहर लोहीया माध्यमिक व उच्च माध्यमिक या विद्यालयाचा निकाल ५०.४१% इतका जाहीर झाला असून विद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. प्रथम- कुणाल योगेश डिके ७७.५०द्वितीय- दर्शन अशोक पाटील ७७.४०तृतीय- चंचल बापू शिंदे ७३.६०
श्री.एच.बी.सांघवी हायस्कूल,खेडगाव नंदीचे
या शाळेचा एसएससी परीक्षेचा निकाल ७६.४७ इतका जाहीर झाला असून या शाळेतील प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत. प्रथम- मयुरी अनिल बागुल ८७.२० द्वितीय- शहबाज अमीन मन्यार ७९.०० तृतीय- वेदश्री सुनील बाविस्कर ७७.४०
श्री.शां.न.जैन माध्यमिक विद्यालय,वाडी
संस्थेचे या विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल ७३.३३ टक्के इतका जाहीर झाला असून विद्यालयातून प्रथम तीन येणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत प्रथम- राजवीर अमर काकडे ८४.४० द्वितीय- हर्षल संभाजी पाटील ७६.४० तृतीय रोहित प्रकाश पाटील ७२.८०
श्री.सु.वि.माध्यमिक विद्यालय ,माहेजी
संस्थेच्या या विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल ७३.६८ इतका जाहीर झाला असून विद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.प्रथम (विभागून) कृष्ण संजय कदम ७७.६०,भूमिका अनिल भगत ७७.६० द्वितीय विनीत संजय शिरसाठ ७४.६०
तृतीय – कोसर शरीफ हरदास ६५
आदर्श माध्यमिक विद्यालय,कुऱ्हाड खुर्द
या विद्यालयाचा निकाल ८१.३९ टक्के लागला असून प्रथम तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. प्रथम- वैभव सुभाष देवरे ८२.४० द्वितीय- हर्षदा संभाजी वंजारी ७९.८० तृतीय- विवेक प्रमोद बोरसे ७९.६०
श्रीमती च.ही.राजपूत माध्यमिक विद्यालय,दहीगाव संत
या विद्यालयाचा ८६.६६ टक्के निकाल जाहीर झाला असून विद्यालयातून भाग्यश्री संजय कोळी या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला तर भाग्यश्री अनिल चौधरी आणि काजल तुळशीराम कोळी यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
महात्मा फुले हायस्कूल,भोजे चिंचपूरे
संस्थेच्या या विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल ८६.६६ टक्के इतका जाहीर झाला असून प्रथम तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.
प्रथम- भाविका डीगंबर पाटील ८८.४०,द्वितीय क्रमांक – जागृती धनराज जाधव ८३.८०, तृतीय-जीविका सुनील जाधव ८२
*पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय,सातगाव डोंगरी*
या विद्यालयाचा एकूण निकाल ५९.२५ इतका जाहीर झाला असून विद्यालयातून प्रथम येणारे तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे प्रथम राहुल हिरमल बारेला ६८.६० द्वितीय सलोनी फरीद तडवी ६७.२० अनिल झाका बारेला ६५.८०
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो.दिलीप ओंकार वाघ,चेअरमन नानासो संजय ओंकार वाघ, मानस सचिव दादासो. ॲड.महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासो. व्ही. टी.जोशी यांचे सह सर्व शाळांच्या स्थानिक समितीचे चेअरमन,पदाधिकारी,संचालक, तसेच मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.






















