एकनाथ धनगर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग मध्ये प्रथम येत विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र

एकनाथ धनगर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग मध्ये प्रथम येत विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र..!!!!

भडगाव (प्रतिनिधी) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील इयत्ता बारावी कला शाखेचा विद्यार्थी तथा खेळाडू एकनाथ राजेंद्र धनगर याने १९ वर्षाआतील मुलांच्या ५२ किलो वजनी गटात जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,तर्फे आयोजीत जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले असून त्याची नंदुरबार येथे पार पडणाऱ्या नाशिक विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
एकनाथला आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,प्रा.सतीश पाटील,राष्ट्रीय पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
एकनाथच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,प्र.प्राचार्य संदीप बाविस्कर,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटो caption – बॉक्सर एकनाथ धनगर,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी आदि….