Home पाचोरा तालुका आपल्या भीतर बसलेल्या अहंकाराची बळी द्या, मरकजी इमाम आले मुस्तफा

आपल्या भीतर बसलेल्या अहंकाराची बळी द्या, मरकजी इमाम आले मुस्तफा

आपल्या भीतर बसलेल्या अहंकाराची बळी द्या, मरकजी इमाम आले मुस्तफा

 

 

कुरबानी द्यायची असेल तर सर्वप्रथम आपल्या भीतर बसलेले अहंकार,क्रोध, लालसा, अज्ञान ची कुरबानी द्या असे प्रतिपादन नगरदेवळा जामा मस्जिद मरकजी इमाम आले मुस्तफा यांनी मुस्लिम समाजासमोर ईदुल अजहा (बकर ईद)चे भाषणात केले. आजच्या दिवस फक्त जानवरची कुरबानी नसून ईश्वर साठी आपली प्रत्येक प्रिय गोष्टी ईश्वर प्राप्ती चे सत्य मार्गावर समर्पित करण्याची आठवण आपल्याला देतो. जर ईश्वर अल्लाहने तुम्हाला धनी बनवलेला आहे तर पैशांची लालसा याला बळी पाडून गोरगरिबांची, अनाथ, विधवा, गरजू लोकांची मदत साठी पुढे यावे हाच बकर ईदच्या खरा संदेश आहे, असे आव्हान त्यांनी केले. गुरुवार 28 मे रोजी नगरदेवळा येथे मुस्लिम बांधवाकडून शांतीपूर्ण रीतीने ईद-उल-अजहा (बकर ईद )साजरा करण्यात आली. सकाळी 7.30 वाजता सर्व मुस्लिम बांधव जामा मस्जिद नगरदेवळा येथे जमा होऊन ईदगाह साठी निघाले. ईदगाह येथून नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी अल्लाह ला धन्यवाद प्रस्तुत करून तकबीर जप केला.नंतर जामा मस्जिद इमाम मौलाना आले मुस्तफा यांनी जागतिक शांतता निर्माण होण्यास व आपला भारत देश विकसित व्हावा, जगात व देशातपूर्णपणे शांतता निर्माण व्हावी, जगामध्ये सुरू असलेले युद्ध, जागतिक बंधुत्व बळकट व्हावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली.मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदची शुभेच्छा दिली. यावेळी मौलाना आले मुस्तफा, मौलाना जमशेद रजा, मौलाना इशतीयाक रजा, पोलीस उपनिरीक्षक गंगे साहेब,जाम मस्जिद चेअरमन नूर बेग,गरीब नवाज फाउंडेशन अध्यक्ष शेख अफरोज रहीम, जावेद रहीम, अहतेशाम शेख,वसीम पटवे, मुसशताक खान,सय्यद इमरान अली, गनी सेठ, अन्नू मेंबर, जुबेर खान, सादिक बागवान, अह्तेशाम शेख, वसीम शेख, जावेद शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

Don`t copy text!