भातखंडे केंद्राची शिक्षण परिषद केंद्रप्रमुख अभिजीत खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

भातखंडे केंद्राची शिक्षण परिषद केंद्रप्रमुख अभिजीत खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

पाचोरा येथील सु.भा पाटील प्रशालेच्या इमारतीत माहे जानेवारी २०२३ ची शिक्षण परिषद दि.१८ रोजी केंद्रप्रमुख श्री अभिजीत खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर भातखंडे खुर्द शाळेचे संभाजी पाटील, कन्या शाळेचे गुलाबराव पाटील, गोराडखेडा शाळेचे गुणवंत पवार, माडकी शाळेचे रत्नाकर सोनवणे, कृष्णराव नगर शाळेचे आत्माराम महाजन, ओझर शाळेचे गणेश पाटील यासह सहाव्या अहिराणी भाषे साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. वाल्मीक अहिरे उपस्थित होते. शिक्षण परिषदेचे आयोजन नवजीवन विद्यालय पाचोरा, जि प शाळा पुनगाव व नवीन प्राथमिक शाळा पाचोरा यांच्यामार्फत संयुक्तिकरित्या करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यात जीवन कौशल्य भावभावनांचे व्यवस्थापन या विषयावर नवीन प्राथमिक शाळेचे रमेश मोरे, शालेय स्पर्धा परीक्षा तयारी इयत्ता पाचवी ते आठवी या विषयावर नवजीवन विद्यालयाचे सुधाकर पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यासोबतच अहिराणी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. वाल्मीक अहिरे यांनी अहिराणी भाषेची साहित्यरचना व यातील अलंकारिकता सांगत अहिराणी भाषेचे महत्त्व सांगितले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख अभिजीत सोनवणे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवजीवन विद्यालयाचे मनोज पाटील यांनी तर आभार प्रदर्शन पुनगाव शाळेचे महाजन सर यांनी केले.