“राष्ट्रीय हिंदी दिवस” गो.पु.पाटील,महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न

_”राष्ट्रीय हिंदी दिवस” गो.पु.पाटील,महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न….!!!!_

कोळगाव (भडगाव)- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे “राष्ट्रीय हिंदी दिवस” हिंदी विषयाचे अध्यापक तथा विद्यार्थ्यांच्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व संस्थेचे संस्थापक तात्या बाबा यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थितांच्या हस्ते करुन करण्यात आले,यावेळी ईशस्तवन साक्षी बोरसे,वृषाली पाटील,मनस्वी पाटील,प्राजक्ता पाटील,पायल मालपुरे तर स्वागत गीत दिव्या कोळी,प्रियंका पाटील,कविता महाजन,दिव्या पाटील यांनी सादर केले.
पुजनानंतर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली त्यात,प्रणिता पाटील,स्वाती वाघ,दिपाली महाजन,गायत्री पाटील,योगीता परदेशी,समर्थ केदार,अश्विनी जाधव,चैताली गोसावी,सविता महाजन,मनस्वी पाटील,तेजस्विनी पाटील,रोहिणी पाटील,प्रियंका सोनवणे,वर्षा पाटील,हर्षदा महाजन,साक्षी रावते,गायत्री चौधरी,प्रिती शिंपी,अश्विनी वाघ आदिंनी हिंदी विषयी आपले सुंदर असे विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी जाधव,सुत्रसंचलन प्रियंका पाटील तथा दिव्या कोळी तर आभार चेतना चौधरी यांनी केले,कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्रसंचलन करणाऱ्या कु.प्रियंका व कु.दिव्या यांचा उपस्थित शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
प्रा.तुषार पाटील,प्रा.प्रविण बोरसे व प्रा.किशोर चौधरी आंदि शिक्षकांनी हिदी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
प्राचार्य सुनिल पाटील, पर्यवेक्षक अनिल पवार तथा क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.