Home पाचोरा तालुका गो.पु.पाटील,विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,कोळगाव येथे विद्यार्थी गुणगौरव तसेच प्रा.एम.बी.मराठे यांचा सेवापुर्ती सोहळा...

गो.पु.पाटील,विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,कोळगाव येथे विद्यार्थी गुणगौरव तसेच प्रा.एम.बी.मराठे यांचा सेवापुर्ती सोहळा तसेच पर्यवेक्षिका सीमा शिसोदे यांना पदोन्नतीनिमित्त निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न….!!!!!

गो.पु.पाटील,विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,कोळगाव येथे विद्यार्थी गुणगौरव तसेच प्रा.एम.बी.मराठे यांचा सेवापुर्ती सोहळा तसेच पर्यवेक्षिका सीमा शिसोदे यांना पदोन्नतीनिमित्त निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न….!!!!!

 

 

 

कोळगाव ता.भडगाव:- कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित गोपीचंद पुना पाटील,विद्यालय, कोळगाव ता भडगाव येथे आपल्या आयुष्याची २६ वर्षांची प्रदीर्घ सेवा देऊन प्रा.श्रीमती एम.बी.मराठे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल विशेष कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला,त्याचवेळी पर्यवेक्षिका सीमा शिसोदे यांना संस्थेच्या आदेशाने गिरड येथे उपमुख्याध्यापिकापदी पदोन्नती देण्यात आल्याने त्यांनाही निरोप देण्यात आला तसेच पर्यवेक्षकपदी आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

 

इयत्ता १० वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तथा इयत्ता ८ वीच्या उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा देखील गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

 

कार्यक्रमास प्राचार्य आर आर वळखंडे,माजी प्राचार्य अनिल पवार, प्रभारी कार्यवाहक रघुनाथ पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

 

प्राचार्य आर आर वळखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस ए वाघ यांनी केले,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Don`t copy text!