धनगर समाज एसटी आरक्षण लढा उभारण्या साठी शिर्डीतील दिपक बोर्हाडे यांच्या राज्यव्यापी बैठकीस उपस्थित राहण्याचे विजय तमनर यांचे आवाहन

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
संपूर्ण महाराष्ट्र राज्या मध्ये धनगर समाज एसटी आरक्षण लढा उभारण्या साठी दिपक बोर्हाडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथील होणाऱ्या राज्यव्यापी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन विजय तमनर यांनी राज्यातील सर्व धनगर समाज बांधवांना केले आहे.गेल्या सत्तर वर्षांपासून अनेक पक्षांच्या नेत्यांकडून धनगर सामाजातील जमातीचा एस टी आरक्षण अंमल बजावणी साठीचा मुद्दा हेतुपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला घटनेतच ३६ क्रमांकावर आरक्षण दिलेले आहे.मात्र आतापर्यंत होउन गेलेल्या आणि आता सत्तेवर असलेल्या माजी आजी सर्व सरकार कडून त्याची अंमल बजावणी झालेली नाही.धनगर समाजाला नुसती पोकळ आश्वासने दिली गेली आहेत.या अंमल बजावणी साठी धनगर समाजातील सर्व स्तरातील घटकांना सोबत घेऊन सातत्याने संघर्ष करणारे मल्हारयोध्दे दिपकभाऊ बोऱ्हाडे यांची शिर्डी येथील साईपालखी निवारा येथे दिनांक ११ फेब्रुवारी रोजी एक बैठक संपन्न होत आहे. आगामी काळात भविष्यात धनगर समाजावर होणाऱ्या अंन्याय अत्याचार,प्रखर, तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत विचार विनिमय होणार आहे.ही बैठक धनगर समाजाचे महाराष्ट्र राज्यातील सर्व उपोषणकर्ते, आंदोलक, सामाजिक कार्यकर्ते, नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आजी, माजी पदाधिकारी तसेच धनगर समाजातील सर्व स्तरातील प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत दि.११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत संपन्न होत आहे. या बैठकीत आगामी धनगर जमातीचा एस टी आरक्षण मुक्ती संग्रामाचा राज्य व्यापी लढा आणि मुंबई येथे होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे.तसेच या बैठकीत प्रामुख्याने आझाद मैदान मुंबई येथील होणाऱ्या ऐतिहासिक धनगर समाज एसटी आरक्षण मुक्तिसंग्राम लढ्याची संपुर्ण तयारी या संदर्भातही चर्चा होणार असून संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजातील सर्व लहान थोर विचारवंतांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन श्री.विजय तमनर यांनी संयोजन समितीच्या वतीने केले आहे. महाराष्ट्र राज्यात कोण कुठे काय करतोय याकडे कटाक्षाने लक्ष न देता याच प्रमुख बैठकीस सर्वांनी उपस्थित राहावे असे समाजातील बांधवांना कळविण्यात आले आहे.या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी राज्यातील कोणत्याही कार्यकर्त्यांला काही अडचण असल्यास त्यांनी 9552956866,9421582716, 9604662684,9011111122, 9767727940, 79720000217या नंबर वर संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.
























