Home जळगाव ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण जळगाव येथे “कृषि उद्यमी” निवासी प्रशिक्षण बॅचचा शानदार शुभारंभ

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण जळगाव येथे “कृषि उद्यमी” निवासी प्रशिक्षण बॅचचा शानदार शुभारंभ

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण जळगाव येथे “कृषि उद्यमी” निवासी प्रशिक्षण बॅचचा शानदार शुभारंभ

 

 

 

विशेष प्रतिनिधी: ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुरस्कृत आरसेटी (RSETI – ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था) संस्थेतर्फे “कृषि उद्यमी” या नवीन प्रशिक्षण बॅचचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे.कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी संस्थेचे संचालक सत्यनारायण लाल दास यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. “कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तरुण स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरू करू शकतात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकतात,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.या प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षणार्थींना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी गेस्ट फॅकल्टी विष्णू देवभाजे उपस्थित आहे, ते त्यांच्या अनुभवातून कृषी उद्योगातील व्यावहारिक कौशल्ये शिकवणार आहेत. तसेच फॅकल्टी संजिवनी मोरे आणि दिग्विजय खंबायत हे कृषी व्यवसायातील विविध बारकावे, शासकीय योजना आणि बाजारपेठ व्यवस्थापन याविषयी सविस्तर प्रशिक्षण देणार आहेत.हा कार्यक्रम आणि पुढील प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी आरसेटी कार्यालयाचे ऑफिस असिस्टंट सचिन मराठे अश्विनी मराठे कल्पेश ढिवरे आणि विनोद पाटील हे विशेष परिश्रम घेत आहेत.

Don`t copy text!