निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न


*पाचोरा:-* निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात 75 वा प्रजासत्ताक दिन अतिशय दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. प्रथमतः सकाळी 7:40 वा. संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी शाळेचे प्रचार्य श्री गणेश राजपूत यांनी उपस्थितीतांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व विशद केले. इ. 7 वी च्या विद्यार्थ्यांनी दिमागदार पथसंचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली, ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रमात समूहगान व समूहनृत्याने सर्वांचे मने जिंकले, डिसेंबर महिन्यात संपन्न झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात उत्कृष्ट सूत्रसंचालन व उत्कृष्ट समूह नृत्य सादर करणाऱ्या वर्गांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्षातील सर्वोकृष्ट विद्यार्थी म्हणून कु. अक्षदा विजय पाटील हीस मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी कु. पार्थ निकम व मुख्य विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. दिव्या पाटील यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
संस्थेच्या अध्यक्षा वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना संविधानांचे महत्त्व व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य राष्ट्रासाठी किती महत्त्वाचे आहे हे विशद केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर मैदानी खेळांना महत्व दिले पाहिजे असे सांगून शरीर सुदृढतेचे महत्व नमूद केले.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ वैशाली सुर्यवंशी, उपाध्यक्ष सो. कमलताई पाटील, सचिव श्री नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री गणेश राजपूत, उपप्रचार्य श्री प्रदीप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. जोसेफ आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.