पिंप्री ता.पाचोरा येथे मिशन 500 कोटी लिटर्स जलसाठा मोहीम सुरू

पिंप्री ता.पाचोरा येथे मिशन 500 कोटी लिटर्स जलसाठा मोहीम सुरू

पिंप्री ता.पाचोरा येथे गावातील शेतकरी एकत्र येऊन लोकसहभागातून नाला खोलीकरण-रुंदीकरण, पाणंद रस्त्याची कामे,गाळ तलावातील,नदीतील,धरणातील गाळ काढणे यासारखी कामे लोकसहभागातून होणार आहे यासाठी भारतीय राजस्व सेवेतील प्रशासकीय अधिकारी मा.उज्वलकुमार चव्हाण (उपायुक्त इ. डी) मुबई, मा.शेखर निंबाळकर(पाच पाटील) यांच्या मार्गदर्शनाने सकाळ रिलीफ फंडातून हे काम करण्यात येत आहे.
पिप्री गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती ,परंतु शेतात जाण्यासाठी पावसाळ्यात रस्ता नीट नसल्याने शेतातील पिकवलेले पिकच घरी आणताना त्रास होतो म्हणूनच डोंगरगावचे देविदास सावळे यांनी मिशन 500 लीटर्स जलसाठ्याचे संकल्पक मा.उज्वलकुमार चव्हाण सर,पाच मा.शेखर निंबाळकर सर यांच्याशी संपर्क करून गावातील शेतकऱ्यांना एकत्र केले आणि आता शेतकरी डिझेल टाकुन आणि जेसीबीद्वारे काम करत आहे नाल्यातील माती,मुरूम कोरला जाऊन तो रस्त्यावर टाकायचा यातून रस्ताही होतो आणि नालाही खोल होऊन त्यात पाण्याचा साठा तयार होतो .अशा प्रकारची कामे आता होणार आहेत त्यात
*डिझेल भरा खालील कामे करा..*
नदी खोलीकरण (ओढे) खोलीकरण शेतात जाणारे पाणंद रस्तेशेत बांध-बंदिस्ती करणे
विहिरी पुनर्भरण करणे
केटी खोलीकरण व माती बांध खोलीकरण व गाळ काढणे
चर खोदून घेणे
शोष खड्डे खोदून घेणे
वृक्ष लागवडीसाठी खड्डे करणे
यासह शेतीसंबंधी पाणी अडविण्यासाठी करण्यात येणारे इतर कामे केली जाणार आहे
आज रस्त्याच्या प्रत्यक्ष ठिकाणी गावातील शेतकरी उत्साहाने काम करीत आहे. सुधाकर पाटील,नाना पाटील, दत्तू पाटील पाटील,गायकवाड सर,अर्जुन दादा,विकास पाटील,समाधान पाटील,श्रीहरी पाटील,साहेबराव सुस्ते पाटील,जगदीश पडोळ,सुभाष पडोळ, जगन पडोळ, तेजराव आमटे,नर्मलबाई कदम ,विश्वनाथ कदम, कैलास बोरसे,रमेश बोरसे,योगेश नेरपगार,जगदीश नेरपगार,वामन पडोळ,अशोक पडोळ,अनिल पडोळ,भाऊसाहेब पडोळ, दौलत गायकवाड, कृष्णा पडोळ,भाऊसाहेब पडोळ,एकनाथ आमटे,बापू आनंदा बढे,इत्यादी शेतकरी यात सहभागी आहेत.गावातील इतर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कामे करून घ्या असे आवाहन मा उज्वलकुमार चव्हाण सर,शेखर निंबाळकर सर आणि देविदास सावळे यांनी केले आहे