Home महाराष्ट्र रावेरी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न

रावेरी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न

रावेरी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न

 

 

 

सोयगाव | प्रतिनिधी दत्तात्रय काटोले

सोयगाव तालुक्यातील रावेरी शिवारात बिबट्या दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी (ता. …) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतात गेलेल्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सुदैवाने प्रसंगावधान राखत शेतकरी थोडक्यात बचावले.

कंकराळा येथील गणेश दिनकर पाटील हे रावेरी शिवारातील गट क्रमांक ८ मधील शेतात मोटार सुरू करण्यासाठी गेले असता तुरीच्या पिकातून संशयास्पद आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले असता सुमारे १०० मीटर अंतरावर बिबट्या दिसला. अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करत पाठलाग सुरू केला. घाबरून न जाता गणेश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता बांधाकडे धाव घेतली व तेथून मोटारसायकलवरून थेट गावात पोहोचले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच गावातील १० ते १५ नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फटाके फोडत आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. शेताला पाणी दिलेले असल्याने घटनास्थळी बिबट्याचे पायांचे ठसे स्पष्टपणे दिसून येत आहेत.

या घटनेमुळे रावेरी व परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात जाणे धोकादायक बनले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित वनविभाग व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

फोटो दत्तात्रय काटोले

Don`t copy text!