Home पाचोरा पाचोरा कन्या विद्यालयाच्या “प्राचार्य पदी डॉ. शिवाजी शिंदे”

पाचोरा कन्या विद्यालयाच्या “प्राचार्य पदी डॉ. शिवाजी शिंदे”

पाचोरा कन्या विद्यालयाच्या “प्राचार्य पदी डॉ. शिवाजी शिंदे”

 

 

 

 

पाचोरा….

नगरदेवळा येथील विश्वासराव पवार ट्रस्ट संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय पाचोरा शाळेच्या प्राचार्य पदी डॉ. शिवाजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वीच्या प्राचार्या श्रीमती उज्वला देशमुख या नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्या. रिक्त जागेवर डॉ. शिवाजी शिंदे यांची पदोन्नतीने नेमणूक करण्यात आली आहे.

31 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असलेले डॉ. शिवाजी शिंदे हे नामांकित गिरणाई शिक्षण संस्थेचे सहसचिव आहेत. त्यांनी इंग्रजी विषयात एम. ए. बी.एड. केले असून अल्टरनेटिव्ह मेडिसिन विषयात एमडी तसेच ॲक्युप्रेशर विषयात पीएचडी डिग्री प्राप्त केली आहे. नामांकित पत्रकार, संवेदनशील कवी, उत्कृष्ट निवेदक, व अभ्यासू शिक्षक म्हणून त्यांना ओळखले जाते. डॉ. शिवाजी शिंदे यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

Don`t copy text!