चोपडा महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे ‘एक दिवसीय छात्र संगोष्ठी’चे आयोजन’

चोपडा महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे ‘एक दिवसीय छात्र संगोष्ठी’चे आयोजन’

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे आज दि. १० मार्च २०२३ रोजी ‘एक दिवसीय छात्र संगोष्ठी’चे आयोजन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माजी शिक्षणमंत्री कै.ना. अक्कासो.सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य डॉ.के.एन. सोनवणे व हिंदी विभाग प्रमुख डॉ.ए.बी. सूर्यवंशी आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला व दिलेल्या विषयावर १२ विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले. त्यामध्ये प्रथम पारितोषिक माळी कविता रामचंद्र तृतीय वर्ष कला विभाग , द्वितीय पारितोषिक मानसी निलेश बिरारी प्रथम वर्ष शास्त्र विभाग, तृतीय पारितोषिक हर्षदा गुलाब पाटील तृतीय वर्ष व्यवस्थापन विभाग, उत्तेजनार्थ पारितोषिक गणेश देविदास कोळी द्वितीय वर्ष व्यवस्थापन विभाग असे इत्यादींनी यश संपादन केले.
या कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य एन.एस. कोल्हे म्हणाले की, विध्यार्थाने वाचन करावे व आपली विचार क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे यातून विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्ये वाढीस लागेल.
या कार्यक्रमाप्रसंगी परीक्षक म्हणून मराठी विभागाचे डॉ.एम.एल भुसारे व भूगोल विभागाचे एम.बी.पाटील यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख डॉ ए. बी. सूर्यवंशी यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिन पठान यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रा.डॉ. पी.एस लोहार, डी .एस.पाटील, व्ही.पी. हौसे, ए.एच.साळुंखे डॉ. आर. आर पाटील, एस. बी. पाटील, डॉ .एस. एन. पाटील व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंदी विभागातील विद्यार्थी अजिंक्य मोरे, प्रिती तुळस्कर, मुस्कान पठान इत्यादींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.