भारतीय जनता पार्टी, महराष्ट्र प्रदेश च्या ३ दिवशीय प्रशिक्षण शिबिरास खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून आपले विचार मांडले

भारतीय जनता पार्टी, महराष्ट्र प्रदेश च्या ३ दिवशीय प्रशिक्षण शिबिरास खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून आपले विचार मांडले…

भारतीय जनता पार्टी, महराष्ट्र प्रदेश कडून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन (मुंबई) येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी ३ दिवशीय *”प्रशिक्षण शिबीर”* चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी सदर शिबिरास उपस्थित राहून राष्ट्रीय सरचिटणीस श्री.विनोदजी तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे व जेष्ठ नेते श्री.सुधिरजी मुनगंटीवार व इतर प्रमुख वक्त्यांचे विचार जाणून घेतले तसेच *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी आपले विचार मांडले.

सदर प्रशिक्षण शिबिरात यावेळी एकात्म मानवतावाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद, आपले सैद्धांतिक कुटुंब आणि आपली भूमिका, आपली कार्यसंस्कृती आणि कार्यपद्धती, राष्ट्र उभारणीतील भाजपाचे योगदान, मोडी सरकारची दूरगामी परिणाम करणारी धोरणे, मोदी सरकारच्या गोरगरीबांसाठीच्या कल्याणकारी योजना, मादी सरकारची कृषी क्षेत्रातील कामगिरी, भारताचे पारराष्ट्र धोरण, आपली संरक्षण क्षमता आणि राष्ट्रीय सुरक्षा, मिडिया व्यवस्थापन, सोशल मिडीयाचा अचूक वापर, निवडणूक व्यवस्थापन या सारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.