सामाजिक बांधिलकी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

सामाजिक बांधिलकी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप…

आजी माजी सैनिक व पोलीस शिपाई यांनी केले वाटप…

पाचोरा ( प्रतिनिधी ) =पाचोरा तालुक्यातील लोहरी, आर्वे, लोहरी खुर्द येथील आजी माजी सैनिक व पोलीस शिपाई यांनी एकत्रितपणे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्यानिमित्त गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे स्वखर्चाने विकत घेऊन ते शाळेत वाटप करण्यात आले.

जीवनामध्ये यशस्वी बनायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना सुमारे…. दप्तराचे वाटप यावेळी करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.