महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण पिंप्राळा येथील भवानी मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडून जाहीर सभा
जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाले असून उद्या दिनांक ४ जानेवारी २०२६ रविवारी रोजी सायंकाळी ५:०० वाजता भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष मा आ रवींद्र जी चव्हाण साहेब यांच्या हस्ते पिंप्राळा येथील भवानी मंदिर येथून महायुतीच्या ७५ उमेदवारांचे प्रचाराचे नारळ फोडून लगेचच प्रचंड जाहीर सभा घेण्यात येणार आहे सदर या प्रसंगी भाजप नेते मा ना गिरीश भाऊ महाजन पालक मंत्री ना गुलाब भाऊ पाटील,केंद्रीय मंत्री ना रक्षाताई खडसे मा ना संजयजी सावकारे,खा स्मिताताई वाघ माजी मंत्री आ अनिल पाटील माजी मंत्री गुलाबराव देवकर,आ सुरेश भोळे राजू मामा,आ मंगेश दादा चव्हाण, आ चंद्रकांत सोनवणे आ किशोर अप्पा पाटील,आ अमोल दादा जावळे,आ चंद्रकांत पाटील आ अमोल पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार RPI आठवले गट अनिल अडकमोल तसेच महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे या नंतर सायंकाळी ५ :०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पिंप्राळा येथे प्रचंड जाहीर सभा येथे होणार असून महायुतीच्या सर्व ७५ उमेदवार ,व भाजप, शिवसेना शिंदे गट , राष्ट्रवादी काँग्रेस अ पवार , RPI आठवले गट सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे
आपला नम्र
मनोज भांडारकर
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाजप जिल्हा महानगर

















