श्री. शेठ मु. मा. महाविद्यालयात ‘एड्स’ जनजागृतीपर व्याख्यान

श्री. शेठ मु. मा. महाविद्यालयात ‘एड्स’ जनजागृतीपर व्याख्यान

 

 

 

पाचोरा दि. 07 – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव, जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण विभाग जळगाव, जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव व ICTC RRC विभाग ग्रामीण रुग्णालय पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स पंधरवड्यानिमित्त ‘एड्स’ जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. व्याख्यानाची सुरुवात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करुन झाली.

या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानावरून महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव एस. वले यांनी एचआयव्ही रोखण्यासंदर्भात किशोरवयीन युवकांची भूमिका महत्त्वाची आहे असे स्पष्ट केले. यावेळी पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे आयुष विभागाचे वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. पंकज नानकर यांनी ‘आयुर्वेद व योगाभ्यास’ या विषयावर, ग्रामीण रुग्णालय ICTC RRC विभागाचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मा. डॉ. श्रीकांत भोई यांनी ‘एचआयव्ही एड्स व युवकांची भूमिका’ या विषयावर, ग्रामीण रुग्णालय ICTC RRC विभागाच्या समुपदेशक मा. डॉ. लता चव्हाण यांनी ‘एचआयव्ही संदर्भात किशोरवयीन युवकांची जबाबदारी’ या विषयावर तर रोटरी क्लबचे तालुकाध्यक्ष मा. डॉ. मुकेश तेली यांनी ‘रक्तदान हे सर्वोत्तम दान’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून रक्तदानाचे आवाहन केले.

यावेळी प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष बी. पाटील, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, मा. डॉ. संजय कोतकर, डॉ. के. एस. इंगळे, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, IQAC समन्वयक डॉ. शरद पाटील, डॉ. माणिक पाटील, डॉ. शारदा शिरोळे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील भोसले, रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदीप रुद्रसवाड, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. अक्षय तडवी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. व्याख्यानाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील भोसले, सूत्रसंचालन डॉ. के. एस. इंगळे तर आभार रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. क्रांती सोनवणे यांनी केले.