Home पाचोरा तालुका जिल्हा परिषद उर्दू शाळा नगरदेवळा येथे ‘स्कॉलरशिप सप्ताह’ उत्साहात साजरा

जिल्हा परिषद उर्दू शाळा नगरदेवळा येथे ‘स्कॉलरशिप सप्ताह’ उत्साहात साजरा

जिल्हा परिषद उर्दू शाळा नगरदेवळा येथे ‘स्कॉलरशिप सप्ताह’ उत्साहात साजरा

 

 

 

कृतीच्या माध्यमातून शिक्षण देणारी जिल्हा परिषद उर्दू शाळा, नगरदेवळा (ता. पाचोरा) येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि २६ एप्रिल रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्कॉलरशिप परीक्षेच्या पार्श्वभूमीवर, शाळेत ‘स्कॉलरशिप सप्ताह’ साजरा करण्यात आला.

 

वर्गशिक्षिका सना फिरदौस अन्सारी यांनी माहिती देताना सांगितले की, या सप्ताहात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या मागील पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेण्यात आला. प्रश्नपत्रिका आणि ओएमआर (OMR) शीट शाळेकडून पुरवण्यात आल्या. यावेळी वेळेच्या नियोजनावर (Time Management) विशेष भर देण्यात आला. तसेच, प्रत्यक्ष परीक्षा हॉलमध्ये जसे वातावरण असते, तसा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आला.

 

जावेद रहीम यांनी सांगितले की, जर विद्यार्थ्यांनी आतापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण केली, तर त्यांना भविष्यात राज्य आणि केंद्रस्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच यश मिळेल. याच उद्देशाने आम्ही सहा महिन्यांपूर्वीच स्कॉलरशिप परीक्षेची तयारी सुरू केली होती. विद्यार्थ्यांच्या शिकवलेल्या विषयानुसार दर आठवड्याला नियमित चाचण्या घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि स्कॉलरशिप गाईड शाळेतर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात आले. आमचे ध्येय जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यशस्वी करणे हे आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीनुसार आम्हाला उत्तम निकालाची अपेक्षा आहे.

 

या उपक्रमासाठी मुख्याध्यापक रफीक शेख निसार, नवीदा अन्सारी, जावेद रहीम, अजहरर शेख, शेख रिजवान, शेख खलील आणि सना शोएब अन्सारी यांनी विशेष प्रयत्न केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसीम शेख, उपाध्यक्ष अफरोज शेख, अन्सार शेख, मुश्ताक खान, उमर बेग, मोहसिन शेख, वसीम पटवे, इमरान अली सय्यद, नासीर मण्यार, मजहर बागवान आणि सर्व सदस्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून उत्तम निकालाची आशा व्यक्त केली आहे.

Don`t copy text!