फरार गुन्हेगाराला पकडण्या साठी गेलेल्या पोलिस पथकावर बेछुटपणे गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींच्या पाथर्डी पोलिसांनी पाठलाग करत मुसक्या आवळून गजाआड केले
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
फरार गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर बेछुटपणे गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना गजाआड करण्यात पाथर्डी पोलिसांना यश आले आहे. पाथर्डी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करून गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या वर वचक निर्माण केला आहे.
या बाबदची माहिती अशी की ४ जून रोजी २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील गुन्हे शाखेचे पोलिस पथक अक्कलकोट येथील गुन्हा रजिस्टर नंबर ३४२/२०२६ भारतीय न्याय संहितेचे कलम ३०९(४)या जबरी चोरीच्या तपासासाठी पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे आले होते.सदर गुन्ह्यातील पोलिसांना वांटेड असलेला संशयित आरोपी पावलस उर्फ मेहेर कचरू गायकवाड राहणार,भगवान गड रोड,खरवंडी कासार,तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर व त्याचे साथीदार यांना पकडण्या साठी सदर ठिकाणी हे पोलिस पथक आले होते.सदर पथकातील सोलापूर जिल्हा पोलिस पथकाने पाथर्डी पोलिस स्टेशनचे अंमलदार यांना मदतीला घेतले होते.पोलीस पथक आरोपींच्या खरवंडी कासार, येथिल घरासमोर गेले असता संशयित आरोपी पावलस उर्फ मेहेर कचरू गायकवाड यांनी पोलिस पथकास पाहून तुम्ही कोण आहात? येथे काय करता? असे म्हणले असता पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस शिपाई आसाराम बटुळे यांनी त्यास आम्ही पोलिस आहोत तुझ्या कडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करणे आवश्यक आहे.तु पोलीसांना शरण येऊन आम्हाला तपास कामात सहकार्य कर असे म्हणाले असता त्याने पोलिसांचे काही एक म्हणणे ऐकून न घेता त्याच्या जवळ असलेल्या पिस्तुलातील गोळी पोलिस शिपाई आसाराम बटुळे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फायर केली.मात्र ती गोळी आसाराम बटुळे यांनी चतुराईने चुकवीली. त्यानंतर आरोपीने पोलीसावर बंदुक ताणुन त्याच्या साथीदारा सह त्याच्या घरासमोर लावलेल्या एक्स यु व्ही या चारचाकी गाडी मधुन पलायन केले.पावलस उर्फ मेहेर कचरू गायकवाड व त्याचे तिन साथिदार यांच्या विरोधात सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजय आसाराम शिंदे यांच्या फिर्यादीवरून वरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पाथर्डी पोलिस स्टेशनचे दोन पोलिस पथके सदर आरोपीचा खरवंडी कासार भागात शोध घेत असताना ९ जुन २०२६ रोजी खरवंडी कासार शिवारातील तांड्यावर सदर आरोपी आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.तेथिल तांड्यावरून पोलीसांना पाहून पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे १)सुदाम बबन राठोड,(वय वर्षे २५),राहणार दुर्गानगर तांडा, खरवंडी,२)कृष्णा बाळू पवळे,(वय वर्षे २४),खरवंडी कासार,३) इब्राहिम महंमद सय्यद (वय वर्षे १९), सर्व राहणार खरवंडी कासार, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर अशी असल्याची सांगितली.सदरचा गुन्हा त्यांच्या अजून काही साथीदारा सह केला असल्याची कबुली त्यांनी पोलीसांना दिली आहे.सदर संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना ९ जुन रोजी अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.अजून दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस सब इन्स्पेक्टर विशाल लहाणे हे घेत आहेत.सदरची कारवाई ही अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू साहेब यांच्या मार्गदर्शना खाली पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब,पोलिस उपनिरीक्षक विशाल लहाणे, संदिप ढाकणे,पोलिस कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, संजय जाधव, ईजाज सय्यद,सागर बुधवंत,ज्ञानेश्वर ईलग,महेश रूईकर,गोकुळ वाघ,संदिप कळमकर, महिला पोलिस शितल गुंजाळ,चालक रविंद्र चव्हाण, गोविंद दराडे यांच्या पथकाने केली आहे. पाथर्डी तालुक्यात अजूनही अनेक ठिकाणी गावठी कट्टे बाळगणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना गजाआड करावे अशी सर्व सामान्य नागरिकांची मागणी आहे.























