तरुणींनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे व स्वतःची ओळख निर्माण करावी- सौ.सुनंदाताई पवार

तरुणींनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे व स्वतःची ओळख निर्माण करावी- सौ.सुनंदाताई पवार

चोपडा: येथे बारामती ऍग्रो लिमिटेड आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२४ जानेवारी २०२३ मंगळवार रोजी सकाळी १० वाजता मकर संक्रांतीनिमित्त ‘हळदी कुंकू’, ‘महिला सुसंवाद’ व ‘युवतींसाठी हेल्थ अँड हायजिन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी सुरेल स्वागतगीत सादर केले. या कार्यक्रमाचे उदघाटन ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या संचालक सौ.सुनंदाताई पवार यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माजी शिक्षणमंत्री कै.मा.ना. अक्कासो सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संस्थेचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील कार्यक्रमाच्या उदघाटक व ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या संचालक सौ. सुनंदाताई पवार, प्रमुख पाहुणे तसेच सावी फाऊंडेशन अकलूजच्या अध्यक्ष सौ. सविता रणजीत व्होरा, सौ. पूनम गुजराथी (अध्यक्ष, चोपडा इनरव्हील), संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती. आशाताई विजय पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.डी. ए. सूर्यवंशी यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.सौ.प्रिती रावतोळे यांनी करून दिला.
याप्रसंगी सौ.सुनंदाताई पवार विद्यार्थिनींशी सुसंवाद साधतांना म्हणाल्या की, ‘मुलींनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. फसव्या वयाला बळी पडू नये. शरीराची काळजी घेऊन व्यायाम, आहार यांवर लक्ष द्यावे. तंत्रज्ञानाचा काळजीपूर्वक वापर जपून करावा. मुलींनी भविष्याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा व शरीरात होणारा बदल नम्रपणे स्वीकारावा’. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून ऍड. संदीप सुरेश पाटील यांनी चालविलेल्या शैक्षणिक वारसाचे कौतुक केले.
याप्रसंगी उपस्थित तरुणींना मार्गदर्शन करतांना सौ. सविता व्होरा म्हणाल्या की, ‘मुलींनी आईवडिलांचा मानसन्मान राखावा. आई वडिलांचा सन्मान व्यासपीठावर व्हायला हवा. तुमचा आदर्श आई वडील आहेत. त्यांचा नेहमी आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनावर ताबा ठेवावा व मानसिकदृष्ट्या परिपक्व व्हावे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील यांनी महिलांच्या बाबतीत राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.संदीप बी. पाटील यांनी केले तर आभार सौ.अनिता सांगोरे यांनी मानले.
‘महिलांशी सुसंवाद व हळदी कुंकू’ या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संस्थेचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील, कार्यक्रमाच्या उदघाटक व ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या संचालक सौ. सुनंदाताई पवार, प्रमुख पाहुणे सौ. सविता व्होरा, सौ. पूनम गुजराथी( अध्यक्ष, चोपडा इनरव्हील), संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती आशाताई विजय पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील यांनी सुनंदाताई पवार व सौ. सविता व्होरा यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले व संस्थेच्या कार्याचा तसेच शैक्षणिक प्रगतीचा परिचय करून दिला आणि उपस्थित महिला भगिनींचे अभिनंदन केले.
यावेळी प्रमुख पाहुण्या सौ. सविता व्होरा महिलांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, ‘लेकींना सक्षम करायला हवे. मुलींना व स्रियांना सामाजिक जाचातून मुक्त करायला हवे. हळदी कुंकू हा वैचारिक हळदी कुंकू व्हायला हवा. स्व-जाणीव ठेवावी व स्वतःला ओळखायला हवे.
सौ. सुनंदाताई पवार मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, ‘हळदीपासून बनविलेला कुंकू वापरा. स्रियांनी एकमेकीला सहकार्य करावे. आज संस्कारक्षम पिढीची गरज असल्याने स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे.
या कार्यक्रमाची सांगता उपस्थित महिला भगिनींच्या प्रश्नोत्तराने झाली. यावेळी सौ. वसुंधराताई लांडगे, सौ. नीलिमा पाटील, सौ. चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी वीरपत्नी यांचा सत्कार करून हळदी कुंकू कार्यक्रमाची नवी संकल्पना मांडली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.एम.टी.शिंदे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.एस. ए.वाघ यांनी करून दिला तर आभार सौ.के.एस.क्षीरसागर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए. एल.चौधरी, उपप्राचार्य श्री. एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा. डॉ.के.एन.सोनवणे तसेच सर्व समिती प्रमुख व सदस्य यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी चोपडा परिसरातील महिला, भगिनींनी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.