Home महाराष्ट्र अंभोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नागरीकांना सावधानतेचा इशारा : प्रभारी मंगेश साळवे 

अंभोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नागरीकांना सावधानतेचा इशारा : प्रभारी मंगेश साळवे 

अंभोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नागरीकांना सावधानतेचा इशारा : प्रभारी मंगेश साळवे

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस स्टेशन तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करून सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे की आपल्या भागामध्ये एक अट्टल दरोडेखोरांची टोळी गावोगावी फिरुन दरोडे टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्याकडे,एक काळ्या रंगाची युनिकॉन गाडी, एक काळ्या रंगाची शाईन गाडी,आणि एक ग्रे कलरची बलेरो गाडी आहे.या सर्व गाड्या बिगर नंबरच्या आहेत. या संदर्भात परिसरातील सर्व नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि असे कोणी बाहेरील व्यक्ती आपल्या परीसरात आढळल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ अंभोरा पोलिसांशी संपर्क साधावा किंवा १०० या नंबर वरती काॅल करावा.मागिल काही दिवसांपासून आपल्या आजूबाजूच्या परिसरात अनेक चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.त्यामुळे नागरीकांनी अजिबात घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.परंतू सर्व सामान्य नागरिकांनी जागरूक आणि सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.अंभोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील प्रत्येक गावातील लोकांना कळविण्यात येते की सर्व सामान्य नागरिकांनी आपल्या गावात ग्रामसुरक्षेचे एकत्रितपणे नियोजन करावे.रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी एक स्वतंत्र “ग्राम सुरक्षा मंडळ” तयार करावे.आकरा ते दोन आणि दोन ते पाच अशा तीन तीन तासांच्या गस्त घालत गावातील शिवारात सर्वत्र संचार करावा. अंभोरा पोलिस स्टेशन कडून नियमितपणे सतत रात्रीची पेट्रोलींग सुरू असुन सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस खाते सदैव तत्पर आहे.जर कोणतीही संशयित किंवा अनोळखी व्यक्ती किंवा विना नंबर प्लेटची वाहने आपल्या परीसरात आढळल्याचे निदर्शनास आले तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.अशा कोणत्याही प्रकारच्या संशयित रीत्या हालचाली सुरू असल्यास त्या हालचालींची सर्व माहिती तातडीने अंभोरा पोलिस स्टेशन किंवा आपत्कालीन ११२ किंवा ९२२५०९२८२० या क्रमांकावर कळवावी.तसेच आपल्या जवळील मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम बँकेत अथवा लाॅकरमध्ये सुरक्षित ठेवावी. परीसरातील तमाम नागरिकांनी सतर्क राहून पोलीसांना विशेष सहकार्य करावे.आपल्या सहकार्या मुळेच पोलीसांना घडवणारे गुन्हे रोखण्यासाठी मदत होईल.असे आवाहन अंभोरा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मंगेश साळवे साहेब यांनी केले आहे.”आमची सुरक्षा,आमची जबाबदारी” आपणच घ्या आपली स्वतःची जबाबदारी. “महाराष्ट्रपोलीस “

Don`t copy text!