चोपडा महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागातर्फे “फन अँड मॅजिक इन फिज़िक्स” कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

चोपडा महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागातर्फे “फन अँड मॅजिक इन फिज़िक्स” कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

चोपडा: येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातर्फे दि. १९ मार्च २०२४ रोजी फिज़िक्स विभागातर्फे “फन अँड मॅजिक इन फिज़िक्स” या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यानी जादू प्रमाणे वाटणाऱ्या काही प्रयोगांमागे दडलेले विज्ञान व त्यामूळे फिज़िक्सचे सिद्धांत समजावून सांगितले. विद्यार्थ्यांमधील नवनिर्माण क्षमतेला वाव देवून वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे, जिज्ञासू वृत्ती निर्माण करणे व विद्यार्थ्यांचे सादरीकरण कौशल्य वाढवणे हा त्यामागील उद्देश होता.
सदर कार्यक्रमात Unique Techno Solution, Supplier of Solar Roof Top System व Physics department यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच अनावरण करण्यात आले. यावेळी तसेच विभागातील माजी विद्यार्थिनी मनीषा पवार हिने MPSC परीक्षेत यश प्राप्त करून तलाठी झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी हे उपस्थित होते. याप्रसंगी एम. टेक इलेक्ट्रिकल इंजीनियर विपिन चौधरी, मनीषा पांडुरंग पवार, उपप्रचार्य एन. एस. कोल्हे, समन्वयक डॉ. एस ए वाघ, विभाग प्रमुख डॉ. प्रिती रावतोळे, डॉ. व्ही आर हुसे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सौ. पी. एम रावतोळे यांनी केले तर वक्त्याचा परिचय डॉ. व्ही.आर. हुसे यांनी करून दिला.
या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते Executive Managing Director, Unique Techno Solution विपिन वासुदेव चौधरी यांनी सोलार रूफ टॉप सिस्टमची रचना व कार्य कसे चालते, सोलार पॅनलचे प्रकार याबद्दल electricity च्या जेनेरेशन पासून ते डिस्ट्रिब्यूशन पर्यंतची कार्यपद्धती समजावून सांगितली तसेच सोलार सबसीडीबाबत सरकारच्या विविध योजना याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. तदनंतर मनीशा पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.त्यात त्यांनी हे यश संपादन करताना काय अडचणी आल्या व त्यावर कशी मात केली याबद्दल माहिती दिली.
सदर कार्यक्रमात एकूण ४० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यार्थिनी सिद्धी नेवे हिने केले तर आभार प्राजक्ता वानखेडे यांनी मानले.
ह्या कार्यक्रमासाठी विभागातील प्राध्यापक गोपाल वाघ, जितेन धोबी, निरंजन पाटील, प्राजक्ता वानखेडे व शिक्षकेतर कर्मचारी जितू कोळी, नीलेश भाट व विशाल बोरसे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.