Home महाराष्ट्र पहिल्या जागतिक योगासन चॅम्पियनशिपचा अहमदाबादमध्ये थाटात समारोप

पहिल्या जागतिक योगासन चॅम्पियनशिपचा अहमदाबादमध्ये थाटात समारोप

पहिल्या जागतिक योगासन चॅम्पियनशिपचा अहमदाबादमध्ये थाटात समारोप

 

76 देशांच्या सहभागात भारताचा दबदबा; मुंबईच्या 2 खेळाडूंना 4 सुवर्ण

 

*अहमदाबाद*: योगाला जागतिक क्रीडा प्रकाराचा दर्जा मिळवून देण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल पडले. जगातील पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप 4 ते 8 जून 2026 दरम्यान अहमदाबादमधील ईकेए एरिना, कांकरिया तलाव येथे यशस्वीपणे पार पडली. या पाच दिवसांच्या स्पर्धेत एकूण 76 देशांतील 400 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

 

भारताच्या यजमानपदाखाली झालेल्या या चॅम्पियनशिपने योगासन हे केवळ व्यायाम न राहता स्पर्धात्मक खेळ म्हणून जगासमोर सादर केले. 4 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जागतिक महोत्सवाचे आभासी माध्यमातून उद्घाटन केले. योग हे भारताचे प्राचीन शास्त्र असून आता ते जगभरात क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले. योगासनाला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळावे यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

 

स्पर्धेत खेळाडूंनी पारंपरिक योगासन, कलात्मक योगासन, लयबद्ध योगासन, जोडी योगासनासह_ सात अधिकृत प्रकारांमध्ये आपले कौशल्य, लवचिकता आणि संतुलन सादर केले. प्रत्येक आसनामध्ये ताकद आणि शांततेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. प्रेक्षकांनीही या नव्या खेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

पदकतालिकेत भारताने 102 सुवर्ण, 9 रौप्य, 3 कांस्य अशी एकूण 114 पदके पटकावत अव्वल स्थान पटकावले. जपान 11 पदकांसह दुसऱ्या तर अर्जेंटिना 5 पदकांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.

 

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या स्पर्धेत दमदार कामगिरी करत राज्याचा मान वाढवला. *पालघरचा विधिश जयेश राऊत* याने लेग बॅलन्स आणि ट्रॅडिशनल ग्रुप इव्हेंट या दोन प्रकारांमध्ये सुवर्णपदक मिळवले. त्याचे प्रशिक्षक फैयाझ जमादार आहेत. *मुंबई विभागातील दित्या बालगी* हिने ट्विस्टिंग बॉडी इंडिव्हिज्युअल इव्हेंट आणि ट्रॅडिशनल ग्रुप इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकले. तिचे प्रशिक्षक रुपेश मयेकर आहेत.

 

या ऐतिहासिक स्पर्धेत *टेक्निकल ऑफिशल म्हणून मुंबई विभागा कडून (पालघर )रुचिता ठाकूर,( मुंबई शहर )प्राजक्ता खवळे आणि फैयाझ जमादार(मुंबई उपनगर)* यांनी निष्पक्षपणे काम पाहिले. त्यांच्या परीक्षका मुळे स्पर्धेची पारदर्शकता वाढली.

 

समारोप सोहळ्याला महाराष्ट्र योगासन असोसिएशनचे डॉ. संजय मालपाणी सर, सतीश मोहगावकर सर, महाराष्ट्र ऑलिम्पिक एसोसिएशन सचिव व मुंबई शहर प्रेसिडेंट श्री संजय शेटे सर, डॉ. घनश्याम ढोकरट, सचिव महेश कुंभार सर आदी मान्यवर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले व उपस्थिती दर्शविली. तसेच आणखी एक उलेखनीय काम मुंबई विभागाकडूम करण्यात आले ते म्हणजे या आंतरराष्ट्रीय स्पर्धक जे मुंबई विमानतळावर उतरले त्यांचे स्वागत आदरातिथ्य, त्यांना लागणाऱ्या सर्व सोयी याच विभागातील स्वंसेवक निकिता सिंघल, गणेश टिकम, लतिका जैस्वाल, अमिता यादव, प्रविण गुप्ता, संजय कांटे यांनी केले.

 

या चॅम्पियनशिपचे मुख्य उद्दिष्ट योगासनाला आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघाची मान्यता मिळवून भविष्यात ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करणे हे आहे. 76 देशांच्या सहभागामुळे हे ध्येय आता प्रत्यक्षात येण्याच्या जवळ पोहोचले आहे, असे आयोजकांनी सांगितले.

Don`t copy text!