पाचोऱ्यात संजयनाना वाघ यांचा संकल्पनेतून “शिक्षक क्रिकेट स्पर्धा” आयोजित
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासो.संजयजी वाघ यांच्या संकल्पनेतून पाचोरा- भडगाव तालुक्यातील सर्व शिक्षक एकत्र यावेत.क्रिकेट खेळाडूंना आपल्या खेळीची संधी मिळावी यासाठी शिक्षक क्रिकेट चषक 2026 पर्व 3 रे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था पाचोरा जिल्हा जळगाव यांच्या वतीने आयोजिलेले आहे.आयोजित शिक्षक क्रिकेट चषक 2026 पर्व तिसरे दिनांक -24 जानेवारी ते 26 जानेवारी रोजी एस. एस. एम. एम. कॉलेज मैदान पाचोरा येथे आयोजित करण्यात आलेला असून स्पर्धेचे उद्घाटन समारंभ गुरूवार दिनांक 24/01/2026 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. या क्रिकेट स्पर्धेत 16 संघ व 208 खेळाडू सहभागी होणार आहेत.आपण जास्तीत जास्त उपस्थिती देऊन शिक्षक क्रिकेट खेळाडूंचा उत्साह वाढवावा असे संस्थेचे म.अध्यक्ष,म. चेअरमन, म.मानद सचिव, म.व्हाईस चेअरमन , संचालक मंडळ व टिचर्स क्रिकेट क्लब,पाचोरा यांनी कळविलेले आहे.

























