Home महाराष्ट्र राहुरी येथे खासदार निलेश लंके यांच्या जाहीर सभेने गोविंद मोकाटे यांच्या प्रचाराची...

राहुरी येथे खासदार निलेश लंके यांच्या जाहीर सभेने गोविंद मोकाटे यांच्या प्रचाराची सांगता 

राहुरी येथे खासदार निलेश लंके यांच्या जाहीर सभेने गोविंद मोकाटे यांच्या प्रचाराची सांगता

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

राहुरी विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीत खासदार निलेश लंके यांच्या जाहीर सभेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार गोविंदराव मोकाटे यांच्या प्रचाराची सांगता झाली. महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगून खासदार निलेश लंके यांनी भाजप सरकार हे शेतकरी विरोधी आणि जातीय तेढ निर्माण करणारे सरकार असल्याची टीका केली.शरदचंद्र पवार हे मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यां साठी (72,000) बहात्तर हजार कोटींची कर्जमाफी दिली होती असे सांगून ते पुढे म्हणाले की आम्ही पण हिंदू आहोत परंतु आम्हाला जातीय दंगलीच हिंदूत्व नको आहे.राहुरीत जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. गोविंद मोकाटे हे आमदार झाले तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा कारभार केला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.एम आय डी सी च्या नावाखाली झेड आर टू कंपनीला जमीन देणार श्रीरामपूर मध्ये त्या कंपनीने काय केले ते एकदा पडताळून पहा असा टोलाही त्यांनी लगावला.तेथिल जनता त्यांना एक दिवस निश्चित जाब विचारल्या शिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा उमेदवार म्हणजे आपल्यातील अण्णा आहे त्याला निवडून द्या असे आवाहन खासदार निलेश लंके यांनी केले.या प्रसंगी भागीनाथ गवळी, नंदराज कुटे पाटील,दत्तू कोरडे,अरुण झाडे,रघुनाथ झीने,उद्धव दुसंग, यांच्या सह माता भगिनी आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरकारी नियमानुसार बरोबर सायंकाळी सहा वाजता प्रचाराची सांगता झाली.

Don`t copy text!