आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगावच्या खेळाडूंची निवड

आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगावच्या खेळाडूंची निवड…!!!!!

कोळगाव (भडगाव) -कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगाव येथील १) जय आत्माराम बिऱ्हाडे (६० किलो ग्रीकरोमन प्रथम),२) सयाजी बापू मदने (७४ किलो फ्रीस्टाईल,प्रथम),३) शिवम सतीश संकपाळ (७९ किलो,फ्रीस्टाईल,प्रथम) यांनी डी.डी.एस.पी.महाविद्यालय,एरंडोल येथे क.ब.चौधरी,उ.म.वि.अंतर्गत आयोजीत,एरंडोल विभाग आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत आप-आपल्या गटात विजय प्राप्त केला असून त्यांची फैजपूर येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तिघांना क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,कार्यवाहक रघुनाथ पाटील,पैलवान अनिल बिऱ्हाडे,पैलवान अशोक पाटील,प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
तिघांच्या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा जिल्हा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,डृॉ.विजय पाटील,प्रा.किशोर वाघ,प्रा.संजय सोनवणे,ढॉ.देवदत्त पाटील,डृॉ.शैलेश पाटील,डॉ.संजय भावसार,डॉ.दिनेश तांदळे,प्रा.हर्ष सरदार,प्रा.जे.बी.शिसोदिया,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,मुख्याध्यापक कमलेश शिंदे,प्र.प्राचार्य नरेंद्र भोसले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.