दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय आणि जनशिक्षण संस्थान जळगाव यांच्यात सामंजस्य करार
चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय आणि जनशिक्षण संस्थान जळगाव यांच्यात नुकताच एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला. या करारांतर्गत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्यावर आधारित कोर्सेस राबविण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येत असल्याने त्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ब्युटी पार्लर, हेयर ड्रेसर, शिलाई, प्लम्बिंग अशा १६ कोर्सेस विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे. तसेच, या सामंजस्य करारांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जनशिक्षण संस्थान जळगावतर्फे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत होईल.
या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. संध्या सोनवणे आणि जनशिक्षण संस्थान जळगावचे संचालक प्रवीण जैन यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
महाविद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ. सौ.स्मिताताई संदीप पाटील यांनी प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे आणि संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एम. सपकाळ, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल. बी. पटले, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. डी. कर्दपवार, डॉ. पी. एन. सौदागर व सौ. आर. पी. जयस्वाल आदि मान्यवर उपस्थित होते.
















