भाग्यलक्ष्मी कॉम्पुटर व्यासपीठाच्या माध्यमातून जनसेवेचा उपक्रम राबवित संतोषभाऊ महाजन यांच्या पुढाकाराने विशेष कॅम्प आयोजित
भाग्यलक्ष्मी कॅम्पुटर व्यासपीठाच्या माध्यमातून जनसेवेचा उपक्रम राबवित संतोषभाऊ महाजन यांच्या पुढाकाराने उद्या, दिनांक २८ मार्च २०२६ (शनिवार) रोजी एस. टी. महामंडळाच्या स्मार्ट कार्ड काढण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
हा कॅम्प कृष्णापुरी येथील मारुती मंदिर येथे सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० या वेळेत पार पडणार असून, या कॅम्पमध्ये नागरिकांना एस. टी. स्मार्ट कार्ड काढण्याची तसेच आवश्यक कागदपत्रांची तपासणी व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी उपयुक्त ठरणारे हे स्मार्ट कार्ड सहज व जलदगतीने मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे स्मार्ट कार्ड अत्यंत उपयुक्त ठरणार असून, त्यांना प्रवासात सवलती व सोयीसुविधा मिळण्यास मदत होणार आहे. कॅम्पदरम्यान संबंधित तज्ञांकडून नागरिकांच्या शंका निरसनाचेही काम करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, शासकीय सेवा लोकांपर्यंत थेट पोहोचविण्याचा हा एक प्रभावी प्रयत्न असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.






















