शेअर मार्केटचे अमिष दाखवून १कोटी२३लाख६७ हजार६०० रुपयांची फसवणूक केलेल्या जालिंदर दहिवाळच्या शेवगाव पोलीसांनी मुसक्या आवळल्या 

शेअर मार्केटचे अमिष दाखवून १कोटी२३लाख६७ हजार६०० रुपयांची फसवणूक केलेल्या जालिंदर दहिवाळच्या शेवगाव पोलीसांनी मुसक्या आवळल्या

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) शेअर मार्केटचे अमिष दाखवून १कोटी२३लाख६७ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव पोलिसांनी जालिंदर संतोष दहिवाळ या ठकसेनाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या बाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक १८ मार्च २०२५ रोजी शेवगाव पोलिस स्टेशनला ज्ञानेश्वर आसाराम देवढे (वय ४२) राहणार दादेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी शेवगाव पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की संशयित आरोपी जालिंदर संतोष दहिवाळ हल्ली मुक्काम राहणार शास्त्रीनगर तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर ,मुळ गाव राहणार पाचोड जिल्हा संभाजी नगर याने फिर्यादीस मी शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करतोय, माझ्या कडे पैसे गुंतवणूक केल्यास मी तुम्हाला मासीक दहा टक्के परतावा देईल असे अमिष दाखवून फिर्यादी कडून रोख व ऑनलाईन स्वरुपात रक्कम रुपये पाच लाख रुपये घेतले होते.फिर्यादीस ठरलेल्या व्यवहारा प्रमाणे परतावा अगर मुळ रक्कम न देता आरोपी हा बाहेरगावी पळून गेला होता.सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील संशयित आरोपी जालिंदर संतोष दहिवाळ याने फिर्यादी प्रमाणे ईतर ही १९ लोका कडून देखिल शेअर मार्केट ट्रेडिंग द्वारे जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून देखील रोख व ऑनलाईन स्वरुपात ठेवी स्वीकारून त्यांना ठरलेल्या व्यवहारा प्रमाणे मुळ रकमेचा परतावा न देता त्यांची देखील फसवणूक केली आहे असल्या बाबद पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. फिर्यादी व एकूण १९ साक्षिदार यांची एकूण रक्कम रुपये १कोटी २३लाख६७हजार६०० रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी जालिंदर संतोष दहिवाळ याच्या विरोधात शेवगाव पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर २५१/२०२५ भारतीय दंड विधान संहिता कलम४०६,४०९, ४२०,सहकलम ३ एम पी आय डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून दहिवाळ हा फरार झाला होता.मा.जिल्हा व सत्र न्यायालय अ.नगर यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळून लावला होता.त्यामुळे आरोपी हा अटक चुकविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सतत ठिकाणे बदलून वास्तव्य करीत होता. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग व्ही.सुंदरडे यांना दिनांक ३ जून २०२५ रोजी गुप्त खबऱ्या मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी जालिंदर संतोष दहिवाळ हा पुणे जिल्ह्यातील चाकण येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांना सांगितली.पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी सपोनी धरमसिंग सुंदरडे यांच्या नेतृत्वाखाली तातडीने तपास पथक नियुक्त करून सदर पथक आरोपीच्या शोधासाठी पुणे जिल्ह्यातील चाकण येथे रवाना केले होते.सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी जालिंदर संतोष दहिवाळ याचा पुणे जिल्ह्यातील चाकण पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत असताना तो रासे तालुका चाकण येथे असल्याची माहिती मिळाल्याने शेवगाव पोलिसांनी चाकण पोलीसांच्या मदतीने तपास करीत असताना तो मिळून आला.आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिस पथकाची चाहूल लागताच तो आरोपी पळून जात असताना शेवगाव पोलिसांनी पाठलाग करत त्याला मोठ्या शिताफीने रंगेहाथ पकडले आणि शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याला नमुद गुन्ह्यात अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून गोवा, उत्तर प्रदेश, गुजराथ अशा विविध ठिकाणी राज्यात वास्तव्य करीत होता.याचा त्यानें पोलीसांच्या समक्ष कबुली जबाब दिला आहे.वरील आरोपींकडून ईतर कोणत्याही व्यक्तींची फसवणूक अगर लुबाडणूक झाली असल्यास त्यांनी बिनधास्तपणे शेवगाव पोलिस स्टेशनला संपर्कं साधावा असे आवाहन शेवगाव पोलिस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे. सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे.अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलिस निरीक्षक समाधान नागरे,तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल आठरे, पोलिस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ, होमगार्ड विजय तुपविहीरे, नगर दक्षिण जिल्हा मोबाईल सायबर सेलचे पोलिस काॅंन्स्टेबल नितीन शिंदे व पोलिस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केली आहे. वरील गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.