काळानुसार बदलत जाणारी नात्यांची समीकरणे ,..,मनाला चटका लावणारे स्थित्यंतरे

काळानुसार बदलत जाणारी नात्यांची समीकरणे ,..,मनाला चटका लावणारे स्थित्यंतरे

आज पासून जवळ जवळ 25 ते 30 वर्ष मागे वळून पाहिले असता…. प्रचंड प्रमाणात झालेला बदल आपल्या सहज लक्षात येतो आणि मनाला कुठेतरी अलगद अशी जाणीव होऊन जाते… आपण जो बालपणाचा काळ अनुभवला आहे तो आज कालच्या मुलांना अनुभवता येत नाही हेच खूप वाईट आहे.. मी सहजच माझ्या बालपणात जरा डोकावून बघितले आम्ही ज्या भागात रहात होतो तेथे एक आजी असायच्या जवळ जवळ आजींचे वय असेल 70 ते 75 वर्ष परंतु आजी आम्हा गल्लीतल्या सर्व मुलींना संध्याकाळी रोज एक गोष्ट सांगायची त्या गोष्टींची मजाच काही निराळी होती आम्हालाही रोज उत्सुकता लागून असायची अर्थात त्या गोष्टींचे अर्थ भविष्यात दडलेले होते हे त्यानंतर समजायला लागले परंतु आजकालच्या मुलांना आजीच्या गोष्टींचा अनुभव क्वचितच असेल फक्त स्कूल ,कम्प्युटर ,फोन्स, यामध्ये आजची पिढी अडकून राहिली आहे त्यामुळे गोष्टीतून झालेले संस्कार त्यांच्या वाट्याला आलेच नाही सहाजिकच आहे कौटुंबिक जिव्हाळा त्यामुळे कमी होत चालला आहे पूर्वी अगदी छोट्या छोट्या घरांमध्ये मोठे मोठे कुटुंब आनंदाने वास्तव्य करायचे. छोट्या-मोठ्या कुरबुरी होत असतील परंतु दुखत प्रसंगाच्या वेळेस एकमेकांना सावरणं सोपे जात असे, परंतु आजकाल घरी खूप मोठी झाली आहेत त्यात राहणारे फक्त बोटावर मोजण्याइतके.. त्यामुळे त्रिकोणी-चौकोनी कुटुंबाच्या पलीकडे माणूस विचारच करत नाही पूर्वी घरात लग्न समारंभ किंवा काही सण वार असले की बरेच दिवस आधी पाहुणेमंडळी वास्तव्यास राहत असे परंतु आज-काल आपल्या कुटुंबा पलीकडे एखादी व्यक्ती अडचण वाटू लागते अर्थात काही कुटुंब याला अपवाद आहेत.. या सर्व स्थित्यंतरामुळे माणूस आतून दुबळा होत चालला आहे वैचारिक क्षमता कमकुवत होत चालली आहे परिणामी आनंद शोधण्यासाठी धडपड सुरू होते मग ज्यांना परवडेल ते मोठमोठे पॅकेजेस घेऊन परदेशात किंवा आपल्या देशात पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी महिना पंधरा दिवस जात असतात परंतु पुन्हा परतून आपल्या चौकोनातच यायचे असते हे ते विसरतात वास्तवाचा सामना करण्याची हिम्मत या बदलांमुळे कमी होत चालली आहे त्यामुळे प्रत्येकामध्ये चढाओढच शर्यत सुरु झाली आहे या सर्व खेळांमध्ये अनेक नाती दुरावली जातात मनं दुखावली जातात….. पूर्वी पत्रव्यवहार असायचं कारण एकमेकाशी संवाद साधण्याचे व सुख दुःख कळविण्याचे एकमेव साधन म्हणजे पत्र रोज पोस्टमन दारावरून जात असल्यावर आपले पत्र आले तर नाही ना ही उत्सुकता वेगळी होती आणि पत्र आले तर ते खूप जिव्हाळ्याने हाताळले जाऊन वाचले जायचे जणू काही आपल्या नातेवाईकच ते पत्राद्वारे आपल्याला भेटायला आले आले आहेत असा भास व्हायचा परंतु फोन मुळे त्या गोष्टीलाही आज आपण पारखे झालो आता फक्त मुलांना पत्रलेखन हा विषय शाळे पुरता मर्यादित राहिला.. मुलांना शिकवताना माझ्या लक्षात आले की जे पूर्वी आपण पत्राद्वारे लहान मोठ्यांना संबोधणे वापरत होतो ते ( तीर्थरूप, तीर्थस्वरूप, लहाण्यांना आशीर्वाद) या गोष्टी मुलांना माहीतच नाही. पत्र लेखनामुळे आपल्या भावना इतरांपर्यंत सहजच पोहोचवल्या जात आता फोन मध्ये मेसेज टाईप करून पाठवले जातात परंतु त्यात डिलीट ऑप्शन असते त्यामुळे भावना डिलीट करण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे…. हे स्थित्यंतरं लवकर थांबवली गेली नाही तर पुढची पिढी भावनिक आनंद झाला पारखी होईल…. म्हणतात काळाबरोबर जो स्वतःत बदल घडवून आणत नाही त्याला मूर्ख समजतात परंतु बदल बदल म्हणत माणूस माणसं सोबत अनोळखी होत चालला आहे…. आधुनिक होण्याच्या नादात आपण इतरांपेक्षा किती वरचढ आहोत हे दाखवण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे आणि हे भावी समाजासाठी घातक… पैशामागे धावणारा माणूस फक्त एक यंत्र मानव म्हणून आयुष्य जगत असतो पैशाला महत्त्व आहे हे मान्य आहे परंतु माणूस हरवत चालला आहे… हेही तेवढेच सत्य आहे 🙏🙏 बाहेर वावरताना माझ्या लक्षात आले बहुतेक बऱ्याच जणांच्या लक्षात येत असेल माणूस किती हुशार असला आणि त्याच्याजवळ वजनदार किसान नसला की त्याच्या विद्वत्तेला ही महत्त्व दिले जात नाही परंतु जवळ वजनदार खिसाअसला की त्या व्यक्तीच्या चपला उचलण्याचे काम देखील लोक मान म्हणून करत असतात पूर्वी या गोष्टी घडत नव्हते आपल्याकडे साठी साहित्य उपलब्ध… ह्या बदलांमुळे सांस्कृतिक बदल देखील झपाट्याने होत आहे पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण लोक सहज अंगी करू लागले आहेत… मला नेहमी आपले विचार मांडायला आवडते असते असंच एकदा सहज एका ग्रुपवर मुलींच्या पोषाखा विषयी पोस्ट टाकली मला माझ्या पोस्टवर रिप्लाय आला की “”मॅडम तुमचे विचार जुन्या पद्धतीचे आणि बुरसटलेले आहेत कारण आम्हा मुलींना काय घालावे काही काय घालू नये पूर्णपणे स्वातंत्र्य आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका” कशा पद्धतीचे विचार आजच्या पिढीचे आहेत अर्थात बरेच वाद-विवाद नंतर त्या मुलीने माफी मागितली कारण तिला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले गेले… स्थित्यंतर हे काळानुसार गरजेचे आहे हे मान्य आहे परंतु बदल नक्की कशात घडवून आणायचं हे आपणच ठरवायचे असते आनंद आपल्या आजूबाजूलाच असतो, तो शोधायचा असतो… काही गोष्टी तुम्ही निस्वार्थी भावनेने करतात त्यातही तुम्हाला स्वर्गीय आनंद मिळू शकतो मी जेव्हा बाहेर सामाजिक काम करत असते बऱ्याच वेळेस अशा कुटुंबांची भेट होते जे या स्थित्यंतरामुळे एकटे पडले आहेत अशा कुटुंबांच्या समस्या ज्यावेळेस सोडवतो त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जगाच्या पाठीवर कुठेही पर्यटनासाठी गेल्यावर मिळणार नाही… त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही कुटुंबात वडीलधारी व्यक्ती असणे म्हणजे आपल्या मुलांच्या भविष्याची आणि संस्कारांची शिदोरी आपल्या जवळ असते मत मांडन हे माझं काम आपल्याला आवडले नसेल सोडून द्या …… धन्यवाद 🙏🙏🙏भेटूया पुढील नविन विषयासोबत….. सौ. ललिता पाटील… महाराष्ट्र राज्य महिला सुरक्षा संघटन जळगाव जिल्हा अध्यक्ष… महिला सुरक्षा पथक पाचोरा तालुका अध्यक्ष 🙏🙏9922092896