श्री गो से हायस्कूल येथे नवनिर्वाचित स्थानिक समिती संचालक मंडळाचा सत्कार संपन्न

श्री गो से हायस्कूल येथे नवनिर्वाचित स्थानिक समिती संचालक मंडळाचा सत्कार संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी)
श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था लिमिटेड च्या नुकत्याच संपन्न झालेल्या बिनविरोध निवडणुकीत नवनिर्वाचित स्थानिक शालेय समिती वरील संचालक मंडळाचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापिका व सर्व पदाधिकारी यांचे हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित शालेय समितीचे चेअरमन खलील दादा देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, ज्येष्ठ संचालक मधुकर पाटील, ज्येष्ठ संचालक अर्जुनदास पंजाबी, सतीश चौधरी, प्रकाश एकनाथ पाटील,भागवत महालपुरे, जिजाबाई अभिमन्यू पाटील, नंदलाल थेपडे, योगेश माधवराव पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांचा शाळेचे सर्व पदाधिकारी नरेंद्र ठाकरे, आर एल पाटील, ए बी अहिरे, ए आर गोहिल, एस एन पाटील, अजय सिनकर, आर बी तडवी, मनीष बाविस्कर, रणजीत पाटील आदींच्या हस्ते व उपस्थितीत संपन्न झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी मनोगतातून संचालक मंडळाच्या सहकार्याचे महत्त्व विशद केले. ए बी अहिरे यांनी आभार व्यक्त केले तर सूत्रसंचालन आर बी बोरसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी सहकार्य केले.