Home पाचोरा रोजगार मेळाव्यात 122 विध्यार्थी यांची मुलाखती द्वारे निवड

रोजगार मेळाव्यात 122 विध्यार्थी यांची मुलाखती द्वारे निवड

रोजगार मेळाव्यात 122 विध्यार्थी यांची मुलाखती द्वारे निवड

 

 

 

*पाचोरा :-* पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल MCVC विभाग व टीम प्लस एच.आर . सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 मार्च रोजी जिल्हास्तरीय रोजगार भरती मेळावा गो.से.हायस्कूल पाचोरा येथे आयोजित करण्यात आला होता .यावेळी 122 विद्यार्थ्यांची निवड झाली.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब श्री.संजय वाघ, संस्थेचे व्हॉइस चेअरमन नानासाहेब श्री.व्ही. टी. जोशी, शालेय समिती चेअरमन श्री.खलीलदादा देशमुख ,तांत्रिक विभागाचे चेअरमन अण्णासाहेब वासुदेव महाजन ,टीम प्लस एच.आर.प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक श्री.बाळकृष्ण मुळे,जेष्ठ संचालक श्री.प्रकाश पाटील ,श्री. भागवत महापुरे सर,प्राचार्य श्री.एन .आर. पाटील सर,उपमुख्याध्यापक श्री. आर .एल .पाटील सर ,किमान कौशल विभाग प्रमुख प्रा. मनीष बाविस्कर सर यावेळी उपस्थित होते

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.तसेच श्री. सागर थोरात सर ,रुपेश पाटील सर यांनी स्वागत गीत सादर केले.

रोजगार मेळाव्या विषयीचे प्रास्ताविक प्रा. मनीष बाविस्कर सर यांनी केले.

यावेळी बाळकृष्ण मुळे यांनी कंपनी संदर्भातील सर्व माहिती दिली.चेअरमन श्री संजय नाना वाघ यांनी विद्यार्थ्यांना रोजगारा संदर्भात अनमोल असं मार्गदर्शन व अनमोल असा सल्ला दिला.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 4 वर्षात नामांकित विद्यापीठातून डिग्रीसह नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.छत्रपती संभाजी नगर,पुणे येथील 4 कंपनी तर्फे मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या.कंपनीतर्फे 15 ते 18000 दरम्यान विद्या वेतन सोबत मेडिकल लाभ ,कॅन्टीन सुविधा ,बस सुविधा इन्शुरन्स, इत्यादी लाभ मिळणार आहे.

पाचोरा ,भडगावसह, नगरदेवळा ,शेंदुर्णी ,नेरी येथील MCVC,आय.टी.आय मधील विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला.

रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी श्री.शरद माथुर र्वश्यसर ,वैशाली भदाणे मॅडम जितेंद्र पाटील ,गौरव सोनवणे ,संजय मलिक ,विजय महाजन,नितीन,जावेद यांनी परिश्रम घेतले.

यावेळी सौ.सौ.जयश्री वाघ मॅडम

श्री. मनोज राऊळ सर,श्री. संजय पाटील सर,श्री.शैलेश शेळके सर,श्री. महाले सर ,श्री. कदम सर, श्री. सुरवाडे सर ,श्री.हितेंद्र देवरे सर ,श्री बोरसे सर श्री किरण पाटील सर ,श्री अहिरे सर ,सौ.वैशाली बोरकर मॅडम यांना सन्मानित करण्यात आले.

सूत्रसंचालन श्री. बोरसे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री शरद माथुरवैश्य सर यांनी केले.

Don`t copy text!