नांद्रा येथे निबांच्या झाडावर विज पडल्याने झाड पेटले

नांद्रा येथे निबांच्या झाडावर विज पडल्याने झाड पेटले….

 

राजेंद्र पाटील नांद्रा(ता.पाचोरा)ता.11 पाचोरा तालुक्यात रात्री शहरासह
ग्रामीण भागात मेघगर्जनासह पावसाने तुरळक हजेरी लावली आहे. तसेच काही ठिकणी दुर्दैवी घटना देखील घडत आहेत. काल शनिवारी रात्रीच्या सुमारास पाचोरा शहरासह तालुक्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान निंबाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने भर पावसात पेट घेतला. मात्र, मोठा अनर्थ टाळला आहे

शनिवारी रात्री दहाच्या च्या सुमारास नांद्रा येथील डॉ.दिपक सुर्यवंशी यांच्या गट न.159गावाजवळील पाटचारी जवळ असलेल्या लिंबाच्या झाडावर ही वीज पडली. त्यामुळे झाडाने भर पावसात पेट घेतला. सुदैवाने अनर्थ टळला. कारण ही घटना रात्री च्या सुमारास घडल्याने त्यावेळेस कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.विज पडुन निंबाचे झाडाने पेट घेतला आहे. वटवाघूळ चार निंब म्हणून या निंबाच्या झाडाचा नावलौकिक. शंभर वर्षांहून अधिक काळाच्या या निंबाच्या झाडावर वटवाघूळ पक्षांचे वास्तव होते म्हणून या निंबाच्या झाडाला वटवाघूळचा निंब म्हणून ओळखले जात होते.आता या निंबाच्या झाडावर विज पडल्याने ते झाड जमीन दोस्त होणार आणि ती जूनी ओळख मिटणार असल्याचे दुःख ग्रामस्थांनी बोलून दाखवले.